अमरावतीः खासदार नवनित राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरातही करोनानं शिरकाव केला आहे. रवी राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये त्यांचा मुलं आणि सासू सासऱ्यांचाही समावेश आहे. आणि आमदार रवी राणा यांना करोनाची लागण झाली नसल्याचं कळतंय.

आमदार रवी राणा यांचे वडिल गंगाधर राणा यांचा रविवारी करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते यांच्यासह ५० ते ६० जणांची करोनाची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रवी राणा यांच्याा आई- वडिलांसोबतच मुलगा-मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण दहा जणांचे चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आमदार रवी राणा यांची मुलगी ७ वर्षांची असून मुलगा ४ वर्षांचा आहे.

वाचाः

दरम्यान, रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला आहे. दरम्यान, करोना संकटाच्या काळात आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि अत्यावश्यक वस्तूच्या वाटपासाठी काही भागांत दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार नवीनत राणाही त्यांच्यासोबत होत्या. रवी राणा यांच्या वडिलांना करोनाचा संसर्ग कसा झाला, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये.

वाचाः

कोव्हिड लॅबमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा प्रकार अमरावतीत उघडकीस आला होता. त्यानंतर खासदार नवनीत राणा चांगल्याच संतप्त झाल्या. नवनीत राणा यांनी पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here