भोकरदन येथील सारंग चोधरी यांचा मुलगा देव चोधरी हा सातारा येथे एमबीबीएस प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे त्याला सोडण्यासाठी सारंग चोधरी, पत्नी वर्षा चोधरी हे अक्कलकोट, पंढरपूर असे देवदर्शन करीत १४ मार्च रोजी सातारा येथे पोहचले. मात्र त्याठिकाणी त्यांना डोक्यात दुखू लागले तेव्हा जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार केले. मात्र तब्येत सुधारत नव्हती त्यामुळे त्यांना पुणे येथे आणले. येथे उपचार करून १६ मार्च छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएममध्ये दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरनी त्यांना अवयदान करण्याचा सल्ला दिला असता. भावी डॉक्टर होत असलेल्या देव चौधरी व वडील सारंग चौधरी व परिवारातील सदस्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यांनी घेतलेल्या या महत्वाच्या निर्णयाने पाच जणांना जीवदान मिळाले आहे.
वर्षा चोधरी यांच्या पार्थिवावर २० मार्च रोजी दुपारी २ वाजता शहरातील स्मशान्मभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्षा चोधरी यांच्या पश्यात पती सारंग चौधरी, मुलगा डॉक्टर देव चौधरी, मुलगी गायत्री चौधरी, असा परिवार आहे. वर्षा चोधरी यांना ब्रेन स्ट्रोक झाला. त्यामुळे त्या अचानक गंभीर आजारी पडल्या असे असताना मुलगी गायत्री ही दहावीची परीक्षा देत होती यावेळी नातलगांनी आईची तब्येत बरी नाहीये. म्हणून तू परीक्षा दे परीक्षा झाल्यावर तू आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जा असे सांगितले. त्यामुळे ती परीक्षा देत होती मात्र नियतीला मान्य नसलेली घटना १९ रोजी रात्री घडली मात्र गायत्रीला हे सांगण्यात आले नाही. व तिची परीक्षेची वेळ संपल्यावर आईचा मृतदेह भोकरदन शहरात आणण्यात आला व त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बैलगाडी मोर्चा काढत, लेकरा-बाळांसह शेतकरी महिला थेट वर्षा बंगल्यावर रवाना