आज गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत आहेत. एकीकडे, ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये ०.३९ टक्क्यांची किंचित घट नोंदवली गेली तर WTI क्रूडचा भाव वाढला आहे. अशा स्थितीत ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल $७५.०३ वर तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल २.५० टक्क्यांनी वाढून $६९.३३ वर व्यापार करत आहे. जागतिक बँकिंग संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आणि आजही त्यात काही सुधारणा होताना दिसत आहे.
जगातील बँकांच्या संकटामुळे अलीकडे क्रूडचा भाव घसरला असला तरी देशात त्याचा परिणाम दिसून आला नाही. गेल्या काही महिन्यांपासून कच्चे तेल महागले असून पेट्रोल-डिझेलच्या किंमती न वाढल्यामुळे तेल विपणन कंपन्या आपला नुकसान सध्या भरून काढत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात देखील वाहन इंधनच्या दरात कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही.
पेट्रोल-डिझेलचा भाव तपासून घ्या
आज राज्यात हिंदू नववर्ष म्हणजे गुडीपाडवा सण साजरा केला जात आहे. अशा स्थितीत अनेक ठिकाणी शोभायत्रेच आयोजन केलं जात आहे. त्यामुळे आज घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शहरातील वाहन इंधनाच्या किमती तपासून पाहा. सरकारी तेल कंपन्या आपल्या ग्राहकांना घरबसल्या SMS द्वारे वाहन इंधनाचे (पेट्रोल-डिझेल) दर तपासण्याची मुभा देतात, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण होणार नाही.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव जाणून घेण्यासाठी इंडियन ऑइलचे ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवू शकतात. तर BPCL चे ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२३११२२२२ वर तर HPCL ग्राहक ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> लिहून पाठवू शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट दर एसएमएसद्वारे पाठवले जातील.