मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारची सत्ताधारी पार्टी जेडीयूनेही प्रतिक्रिया दिली आहे. जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, सुशांतच्या आत्महत्येचा थेट संबंध त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या ‘हत्ये’शी आहे. या सर्व गोष्टी केलेले लोक स्वतःला वाचवण्यासाठी रिया चक्रवर्तीचीही हत्या करू शकतात.

दिशा सालियनच्या आत्महत्येशी संबंधित आहे सुशांतची केस

जेडीयूच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं की दिशा आणि सुशांतच्या केसचा एकमेकांशी संबंध नक्की आहे. ते म्हणाले की, ‘जशा प्रकारे दिशा सालियनची कथित आत्महत्या झाली, मुंबई पोलिसांनी त्या प्रकरणाची अधिक चौकशी केली नाही. आता सुशांतच्या मृत्यूप्रकरणीही ते त्याचप्रकारे कोणताही तपास करत नाहीयेत.’

काही महत्त्वपूर्ण व्यक्ती करू शकतात हत्या

राजीव रंजन म्हणाले की, ‘या दोन्ही प्रकरणात हे एक साम्य आहे. त्याचमुळे काही लोकांच्या सांगण्यावरून रिया चक्रवर्तीची हत्या होऊ शकते. या संपूर्ण प्रकरणात सध्या रियावरच साऱ्यांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. रिया चक्रवर्तीला पोलीस संरक्षण मिळायला हवं किंवा तिने न्यायालयाकडे यासंबंधिची मागणी करायला हवी.’

मुंबई पोलिसांवरही केले आरोप
मुंबई पोलिसांवर आरोप करत म्हटलं की, ‘यात कोणतंच दूमत नाहीये की मुंबई पोलिसांचा तपास न्यायासाठी नाहीये. आता त्यांनी बिहार पोलिसांना यासंबंधीचे सर्व पुरावे त्यांनी द्यावेत आणि बिहार पोलिसांनीच याचा तपास पुढे सुरू ठेवावा.’ दरम्यान, जेव्हापासून बिहार पोलीस मुंबईत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आली तेव्हापासून मुंबई पोलिसांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य केलं जात नाहीये.

याआधी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचीही प्रतिक्रिया आली होती. सुशांतचे वडील त्यांना वाटले तर ते सीबीआय चौकशीची मागणी करू शकतात. पण आम्ही अशी मागणी करत नाही. आम्ही ही केस सोडवण्यात सक्षम आहोत. सध्या बिहारची टीम मुंबईत असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना महत्त्वपूर्ण कागदपत्र सादर केले जातील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here