यानंतर सोमवारी नवीन अपडेट आले असून टाटासोबतचा करार रद्द झाल्यानंतर बिस्लेरीच्या विक्रीची बातमीही संपुष्टात आली. रमेश चौहान यांची ४२ वर्षीय मुलगी जयंती चौहान कंपनीची जबाबदारी सांभाळणार असे कंपनीकडून सांगण्यात आले. जयंतीने बिस्लेरीच्या व्यवसायात रस घेण्यास सुरुवात केली असून आता ती कंपनीची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे बातम्यांमध्ये म्हटले होते, मात्र आता आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे. अशा स्थितीत १९७० पासून रमेश चौहान यांच्या नेतृत्वातील बिस्लेरी सध्या एका निर्णायक वळणावर पोहचली आहे.
वडील-मुलगीत मतभेद
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, जयंतीने पुन्हा बिस्लेरीचा पदभार सांभाळण्यास नकार दिला आहे. बाप-लेकीत मतभेद झाले असून रिपोर्टनुसार बिस्लेरीची कमान आता जयंती चौहान यांच्याऐवजी सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. वृत्तानुसार रमेश चौहान आणि जयंती यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर पोहोचले आहेत. जयंती यांना बिस्लेरीचा व्यवसाय सांभाळायचा नाही, त्यामुळे अचानक रमेश चौहान यांनी कंपनीची जबाबदारी सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपवली. हा निर्णय पूर्वनियोजित नसून रमेश चौहान यांनी हा अचानक घेतलेला निर्णय आहे.
वडिलांशी भांडण
जयंती चौहान यांनी हजारो कोटींचा व्यवसाय सांभाळण्यास नकार दिला असून वडील आणि लेकीमध्ये मतभेद झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे रमेश चौहान यांना सुरुवातीपासूनच कंपनीची कमान मुलगी जयंतीकडे सोपवायची होती, मात्र जयंतीने पॅकेज्ड वॉटर व्यवसायाची जबाबदारी घेण्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.