सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास असून रिंपलच्या चौकशीतून काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. रिंपलने आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय, रिंपलने यूट्युबवर जाऊन How to decompose a body अशी माहितीही सर्च केली होती. रिंपल जैनच्या मोबाईल हिस्ट्रीमधून ही बाब उघड झाली आहे. रिंपल जैनला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी पुढील तपासासाठी रिंपलची कोठडी वाढवून मागितली होती. त्यानंतर शिवडी न्यायालयाने रिंपलच्या पोलीस कोठडीची मुदत २४ मार्चपर्यंत वाढवली होती.
दरम्यान, रिंपल जैन हिने कोर्टातही आईची हत्या केल्याचा आरोप फेटाळून लावला. माझी आई पहिल्या मजल्यावरील चाळीच्या सार्वजनिक शौचालयात जात असताना खाली पडली. यामध्येच तिचा मृत्यू झाला. मी केवळ घाबरून जाऊन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. आईचा मृत्यू झाल्याचे उघड झाले असते तर मामांकडून महिन्याकाठी मिळणारे पैसे बंद झाले असते. तसेच राहत्या घरातूनही बाहेर निघावे लागले असते. याशिवाय, आईच्या मृत्यूचा सगळा आळ माझ्यावर आला असता. त्यामुळे मी कोणालाही काहीही न सांगता आईच्या मृतदेहाचे तुकडे घरातच लपवून ठेवल्याचा दावा रिंपल जैन हिने कोर्टात केला होता.
पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी
मृतदेह कापताना एक मार्बल कटर खराब झाला, थर्टी फर्स्टच्या रात्री मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात
पोलिसांकडून रिंपल जैन हिची कसून चौकशी सुरु आहे. त्यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबरला रिंपलच्या आईचा मृत्यू झाला. त्याचदिवशी रिंपलने हार्डवेअरच्या दुकानातून १४०० रुपयांचा मार्बल कटर आणला. ३१ डिसेंबरच्या रात्री रिंपलने पहिल्यांदा मृतदेह कापायला घेतला. त्यानंतर २ जानेवारी आणि ४ जानेवारी रोजी रिंपलने आईच्या मृतदेहाचे आणखी काही तुकडे केले. यादरम्यान रिंपलने आणलेला मार्बल कटर बिघडला. मग तिने २००० रुपये मोजून आणखी चांगला मार्बल कटर आणला. यादरम्यान रिंपलचा प्रियकरही तिच्या घरापाशी आला होता. त्याठिकाणी येणाऱ्या कुजकट वासाविषयी त्याने रिंपलकडे विचारणा केली. तेव्हा तिने बाथरुम तुंबल्याचे सांगत आपल्या प्रियकराला सक्शन पंप आणायला सांगितला. प्रत्यक्षात रिंपलने आईच्या मृतदेहाचे लहान लहान तुकडे करुन ते बाथरुममधून गटारात टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हे तुकडे बाथरुमच्या पाईपमध्ये अडकून बाथरुम तुंबले होते.