Financial Year Closing, Banking: ३१ मार्चपर्यंत बँकां सुरु राहणार, रविवारीही होणार काम; रिझर्व्ह बँकेचा आदेश – financial year closing rbi directs all banks to keep branches open till march 31
मुंबई : आर्थिक वर्ष २०२२-२३ आता अंतिम टप्प्यात आले असून केवळ ९ दिवसांनी हे आर्थिक वर्ष आपला निरोप घेणार आहे. सरकारी विभाग, मंत्रालयांसह देशातील बहुतेक कार्यालये, संस्था इत्यादींमध्ये वार्षिक क्लोजिंगची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आर्थिक वर्षाची समाप्ती ही बँकांसाठी वर्षातील सर्वात मोठी घटना आहे. यंदाही देशातील सरकारी, निमसरकारी, खासगी, सहकारी बँका यासारख्या बँकिंग संस्था जोमाने काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून मोठी बातमी आली आहे.
बँकांच्या सर्व शाखा ३१ मार्चपर्यंत रविवारी सुरू राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकांना ३१ मार्चपर्यंत शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ या महिन्याच्या ३१ तारखेला संपणार आहे. म्हणूनच देशाच्या केंद्रीय बँकेने बँकांना या महिन्यातील सरकारशी संबंधित सर्व व्यवहार ३१ मार्चपर्यंत निकाली काढण्यास सांगितले आहे. आणि यासाठी त्यांनी बँकांना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. RBI डेप्युटी गव्हर्नर पदासाठी सरकारने मागवले अर्ज; भत्ते आणि इतर लाभासह महिन्याचा पगार इतके लाख आरबीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले की सरकारशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी सर्व एजन्सी बँकांना त्यांच्या शाखा ३१ मार्च रोजी सामान्य कामकाजाच्या तासांपर्यंत खुल्या ठेवाव्या लागतील. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) प्रणालीद्वारे ३१ मार्च रोजी मध्यरात्री १२ पर्यंत व्यवहार सुरू राहतील.
सरकारी चेक जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल, ज्यासाठी डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम (DPSS) आवश्यक निर्देश जारी करेल. DPSS RBI अंतर्गत येते. केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यवहारांचा अहवाल देण्यासाठी रिपोर्टिंग विंडो ३१ मार्च रोजी १ एप्रिल रोजी दुपारपर्यंत खुली राहील.