मधमाशांच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी त्यांनी तेथून धावण्यास सुरुवात केली व स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मधमाशांनी त्यांचा पाठलाग करत हल्ला सुरूच ठेवला व चंपा नेरकर यांच्या शरीरावर डंख मारले. मधमाशांच्या या भीषण हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्याने काही वेळाने किरण चंपानेरकर जमिनीवर कोसळले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना तात्काळ मनोर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात किरण चंपानेरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत किरण चंपानेकर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार असून मनोर ग्रामपंचायतीच्या सदस्या स्वप्नाली चंपानेकर यांचे पती होते.
अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावरही मधमाशांचा हल्ला
काही दिवसांपूर्वी अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावरही मधमाशांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली होती. सातारा- कोल्हापूर महामार्गावर हा प्रकार घडला होता. याठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही झाडे तोडण्यात आली होती. या झाडांचे पुर्नरोपण करण्यासाठी गेलेल्या सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला चढवला होता. सयाजी यांच्या मानेला आणि कानाला मधमाशांनी डंख मारले होते. त्यामुळे त्यांच्या कानाभोवती सूज आली होती. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर होती.