private travels give 50 percent discount for women, गुढीपाडव्याला डबल आनंद; ST पाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सूट – good news 50 percent discount for women traveling by private travels followed by st
चंद्रपूर: एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसेस मध्ये महिलांना ५० टक्के सूट देण्याची चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने घोषणा केली आहे. काल संघटनेची तातडीने बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या निर्णयावर आजपासून म्हणजे गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्यात. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात ५० टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले.याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आता महिला प्रवाशांना आनंदाचा डबल डोज मिळणार आहे. चंद्रपूर- गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने आपल्या बसेस मध्ये महिला प्रवश्याना ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली.मंगळवारला संघटनेची बैठक झाली. या बैठकीत ५०% सूट देण्याच्या निर्णय घेण्यात आला. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या घोषणाची अमलबजावणी सुरू झालेली आहे. ट्रॅव्हल्स ने ये जा करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. संघटनेने घेतलेल्या या निर्णयावर महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमीला लटपटेला PM मोदी म्हणाले,’काही अडचण आल्यास थेट मला फोन कर’ का घेतला निर्णय…
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी स्वागत केले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. महिलांच्या सन्मानासाठी आम्ही हा निर्णय घेतला, असे ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष चंदन पाल यांनी सांगितले.
एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सूट; सरकारच्या निर्णयाचं महिलांकडून कौतुक
काय म्हणाल्या महिला प्रवासी…
आज महागाईनं टोक गाठल आहे. प्रवासही महागला आहे. प्रवासात ५० टक्के सूट देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यासोबतच आता ट्रॅव्हल्स मालकांनी ५०% सूटच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महागाईच्या भार कमी होईल, असे महिला प्रवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्य सरकारने एसटी बसच्या सवलती सोबतच महिलांना सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचे म्हटले होते.