नवी दिल्ली : लोकप्रिय कॉफीहाऊस चेन स्टारबक्सचे नवे सीईओ म्हणून लक्ष्मण नरसिंहन यांनी पदभार स्वीकारला आहे. भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची स्टारबक्सच्या सीईओ पदी गेल्या वर्षीच घोषणा करण्यात आली होती. लक्ष्मण नरसिंहन हे हॉवर्ड शुल्ट्झ यांची जागा घेतील. ५५ वर्षीय नरसिंहन यांच्याकडे कंपनीचा विस्तार आणि उलाढाल वाढवणे यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील. त्याचबरोबर गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. नरसिंहन यांना जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी ते एमएनसी रेकिटचे सीईओ होते.

कोण आहेत लक्ष्मण नरसिंहन?
१५ एप्रिल १९६७ रोजी पुण्यात जन्मलेल्या नरसिंहन यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. यानंतर ते पुढील शिक्षणासाठी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात गेले. तेथून त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ते २०१९ मध्ये रेकिटमध्ये रुजू झाला. कंपनीत दीर्घकाळ काम केले. कंपनीच्या वाढीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

टाटा ट्रस्टमधील खांदेपालट! सिद्धार्थ शर्मा नवीन CEO, देशाच्या राष्ट्रपतींचे होते आर्थिक सल्लागार
कोटी रुपये पगार
नरसिंहन हे गेल्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यांचा पगार उघड झाला होता. द गार्डियनमधील एका अहवालानुसार, स्टारबक्सचे सीईओ म्हणून त्यांचा पगार १७.५ दशलक्ष डाॅलर म्हणजेच १४४ कोटी रुपये असेल. त्यांचा मूळ पगार १.३ दशलक्ष डाॅलरअसेल तर यासोबतच त्यांना पगाराच्या २००% इतके वार्षिक इन्सेंटिव दिले जाईल. इतकेच नाही तर त्यांना १२.७४ कोटी रुपये बोनस म्हणून मिळतील. जुनी कंपनी सोडल्यामुळे होणारे नुकसान भरपाई त्यांना मिळेल. याशिवाय, रेकिटचा बोनस सोडल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ९.३ दशलक्ष डाॅलर किमतीचे शेअर्स मिळतील. त्यांचा पगार रेकिटपेक्षा अडीच पट अधिक आहे. तिथे त्यांना सीईओ म्हणून ५५ कोटी रुपये वार्षिक पगार मिळत होता.

मुकेश अंबानींचे तीन व्याही, तिघांकडेही गडगंज संपत्ती… पाहा कोण आहे सर्वात श्रीमंत
मोठ्या कंपन्यांमध्ये नेतृत्व
नरसिंहन यांना रेकिट, पेप्सिको, मॅकिन्से अँड कंपनी यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव आहे. २०१२ ते २०१९ पर्यंत त्यांनी पेप्सिकोमध्ये मुख्य जागतिक वित्तीय अधिकारी म्हणून काम केले. त्याच वेळी मॅकिन्से अँड कंपनीत काम करताना अमेरिका, आशियामध्ये कंपनीच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना ई कॉमर्समध्ये काम करण्याचा ३० वर्षांचा अनुभव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here