मुंबई: लालबागच्या एका चाळीत काही दिवसांपूर्वी भयंकर घटनेचा पर्दाफाश झाला होता. येथील इब्राहिम कासिम चाळीत राहणाऱ्या रिंपल जैन हिने आपल्या आईची निर्घृणपणे हत्या केली होती. हा संपूर्ण प्रकार अत्यंत क्रूर आणि अंगावर शहारे आणणारा होता. याच हायप्रोफाईल केसचा सध्या काळाचौकी पोलिसांकडून तपास सुरु आहे. काळाचौकी पोलिसांनी १५ मार्चला लालबागच्या पेरुबाग कंपाउंडमधून रिंपलला ताब्यात घेतले होते. तेव्हापासून पोलीस रिंपल जैन आणि तिच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहेत.

मोबाईलच्या सर्च हिस्ट्रीमधून महत्त्वाचा लीड, रिंपलने क्राईम पेट्रोल पाहिलं नंतर यूट्युबवर जाऊन काय सर्च केलं?
रिंपलला सोमवारी शिवडीच्या माझगाव दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी रिंपलने न्यायालयासमोर अनेक नवे खुलासे केले. आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर तब्बल तीन महिने घरापासून लोकांना कसे लांब ठेवले, याची माहिती रिंपलने दिली. रिंपलने या काळात चाळीच्या तळमजल्यावर असणाऱ्या चायनीजच्या दुकानातील आपल्या प्रियकरालाही घरात घेतले नाही. २७ डिसेंबरला रिंपलच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रिंपलचा प्रियकर एकदा तिच्या घराबाहेर आला होता. मात्र, रिंपलने त्याला आतमध्ये येऊन दिले नाही. त्यावेळी रिंपलच्या घरातून कुजलेल्या मृतदेहाचा वास येत होता. मात्र, बाथरुम तुंबल्यामुळे घाणेरडा वास येत आहे, असे रिंपलने प्रियकराला सांगितले. रिंपलने त्याला सक्शन पंप आणायला सांगून बाथरुम साफ केले होते. मात्र, रिंपलने आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला एकदाही घरात पाऊल ठेवून दिले नाही.

Lalbaug Murder: आईचे दोन्ही हात ॲसिडमध्ये टाकले, आग लावली पण घरात प्रचंड धूर झाला; रिंपलचा प्लॅन कसा फसला?

काळाचौकी पोलिसांनी रिंपलचा प्रियकर आणि सँडविचवाल्याची चौकशी केली होती. या दोघांनीही रिंपलच्या आईच्या हत्येत आपला कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले होते. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, रिंपलने आपल्या प्रियकराला आई मामासोबत राजस्थानला गेल्याचे सांगितले होते. तर सँडविचवाल्याला ‘आपली आई वारली असून तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला आहे’, असे रिंपलने सांगितले होते. रिंपलने न्यायालयात आईची हत्या केल्याचा आरोप नाकारला आहे. त्यामुळे सध्या पोलीस वीणा जैन यांच्या ऑटोप्सीच्या अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. यावरुन रिंपलच्या आईचा मृत्यू उंचावरुन खाली पडून झाला होता का तिची हत्या करण्यात आली, याबाबत नेमकी स्पष्टता येऊ शकेल.

पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here