डार्लिंग नदीत याआधीही मासे मृतावस्थेत सापडले होते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. ‘नदीपात्रात जिथवर नजर जाईल, तिथवर मेलेले मासे दिसत आहेत. आधीच्या घटनांशी याची तुलनाच होऊ शकत नाही. काही वर्षांपासून या भागात दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा दोन्ही टोकाच्या नैसर्गिक आपत्ती पाहायला मिळत आहेत,’असं मेनिन्डीमध्ये राहणाऱ्या ग्रीम मॅकक्रेब यांनी सांगितलं.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?
राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ‘नदीला नुकताच पूर येऊन गेला. नदीतील पाणी पातळी वाढली. त्यामुळे बोनी हेरिंग आणि कार्पसारख्या माशांचं प्रमाण वाढलं. मात्र आता पुराचं पाणी कमी होत चाललं आहे आणि मासे मरू लागले आहेत. पुराचं पाणी ओसरल्यानंतर पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. वातावरणातला उकाडा वाढल्यावर माशांना प्राणवायूची अधिक गरज भासते. मात्र माशांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे तडफडून त्यांचा मृत्यू होत आहे,’ अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.