नवी दिल्ली: मोदी सरकारनं अग्निवीर योजनेच्या माध्यमातून भारतीय सैन्यात भरती सुरू केली आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणारे कित्येक तरुण अग्निवीर होण्यास उत्सुक आहेत. मातृभूमीच्या रक्षणासाठी हजारो तरुण भरतीची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे सध्या सैन्यात असणारे हजारो जण बाहेर पडत आहेत. कार्यकाळ पूर्ण झाला नसतानाही हजारो सैनिक सेवेतून बाहेर पडत आहेत. अनेकांनी आत्महत्यादेखील केल्या आहेत.

सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट राहिलेल्या सर्वेश त्रिपाठी यांनी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात नोकरी सोडली. आता त्यांना पुन्हा या क्षेत्रात काम करण्याची इच्छा नाही. ‘जवानांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करावं लागतं. नोकरीत कोणतीही सुरक्षितता नाही. सरकारनं १०० दिवसांच्या सुट्टीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजतागायत ते पूर्ण झालेलं नाही,’ असं सर्वेश म्हणाले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ)कार्यरत असलेल्या ५० हजारांहून अधिक जवानांनी गेल्या पाच वर्षांत नोकरी सोडली आहे. या पाच वर्षांत २०२२ मध्ये सर्वाधिक जवानांनी नोकरीला रामराम केला. गेल्या वर्षात ११ हजार ८८४ जवानांनी नोकरी सोडली.
भयंकर! ट्रकची वृद्धाला धडक, शरीराची अक्षरश: चाळण; तुकडे गोळा करायला फोर्कलिफ्ट आणावी लागली
नोकरी सोडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या सीमा सुरक्षा दलात आहे. याबद्दलची माहिती गृह मंत्रालयानं संसदीय समितीला दिली आहे. गेल्या पाच वर्षांत म्हणजेच २०१८ ते २०२२ या कालावधीत ६५४ जवानांनी आत्महत्या केल्याची आकडेवारीदेखील गृह मंत्रालयानं दिली. जवान नोकरी सोडूत जात असल्याचा परिणाम सीएपीएफच्या कामकाजावर होऊ शकतो. जवानांना सेवेत कायम ठेवायचं असल्यास, त्यांना रोखण्यासाठी कामाची स्थिती सुधारायला हवी, अशी शिफारस समितीनं केली आहे.

जवानांना पोस्टिंग देत असताना रोटेशनल पॉलिसी वापरायला हवी. त्यामुळे जवानांना दुर्गम भागात अधिक काळ राहावं लागणार नाही. या धोरणामुळे आवडत्या ठिकाणी पोस्टिंग मागण्याचं प्रमाणही कमी होईल. त्यामुळे नोकरी सोडण्याचं प्रमाण कमी होऊ शकेल, असं समितीनं म्हटलं आहे.
कॉलेजनं टॉयलेटमध्ये लावले CCTV; मुख्याध्यापकांनी दिलेलं कारण वाचून डोक्यावर हात माराल
गेल्या वर्षी सेवेतून बाहेर पडलेले सर्वेश २०१४ मध्ये सीआरपीएफमध्ये रुजू झाले होते. त्यांना सर्वात आधी गढचिरोलीत तैनात करण्यात आलं. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये पाठवण्यात आलं. आठ वर्षांच्या नोकरीनंतर त्यांनी सीएपीएफला अलविदा केला. जवानांना कुटुंबासोबत राहू दिलं जात नाही. कुटुंबासोबत राहणाऱ्या जवानांची संख्या अतिशय कमी आहे, असं सर्वेश यांनी सांगितलं.

सीआरपीएफसारख्या विभागांमध्ये जवानांची संख्या कमी आहे. त्यामुळे जवानांवर कामाचा अधिक ताण आहे. त्यांना वेळेवर सुट्टी मिळत नाही. लहानसहान सुविधा मिळवण्यासाठी आम्हाला न्यायालयात जावं लागतं. दलात पदोन्नतीदेखील फार उशिरा मिळते. एका अधिकाऱ्याला पदोन्नतीसाठी १३-१४ वर्षे वाट पाहावी लागते, अशी व्यथा सर्वेश यांनी मांडली.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान देशांतर्गत भागांमध्ये आणि सीमावर्ती भागांमध्ये तैनात असतात. त्यांच्या अंतर्गत सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्सचे जवान येतात. या सगळ्या विभागांमध्ये जवळपास १० लाख जवान आहेत. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दलांमधील ८३ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. यावर्षी रिक्त जागा भरण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here