अहमदनगर : राज्याचे वाळू आणि गौण खनिज बाबतचे धोरण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार नागरिकांना एक हजार रुपयात एक ब्रास वाळू मिळणार आहे. या व्यवसायातील एजंटगिरी थांबवून सरकारच आता लोकांना वाळू पुरवठा करणार असल्याने लोकांचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचणार आहे. नव्या धोरणातून वाळू तस्करी पूर्णपणे हद्दपार होईल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोणी बुद्रुक येथे परंपरेनुसार गुढी पाडव्यानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विखे पाटील बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आता कुणाच्या साथीने नाही, स्वतंत्रपणे लोकसभा लढणार, राजू शेट्टींनी मतदारसंघाचा आकडाच सांगितला
राज्याचे नवे वाळू धोरण मंत्री विखे पाटील यांच्याच पुढाकारातून तयार करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सोमवारीच या धोरणाची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना विखे पाटील म्हणाले, आपल्या पुढाकाराने राज्याचे वाळू आणि गौण खनिज बाबतचे धोरण नुकतेच जाहीर करण्यात आले. नागरिकांना एक हजार रुपयात एक ब्रास वाळू मिळणार आहे. लोकांचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचणार आहे. वाळू तस्करी पूर्णपणे हद्दपार करण्यात आली आहे. खडीसाठी नवीन धोरण ठरवण्यात आले आहे, असेही त्यांना सांगितले.

‘कामाचा माणूस’ रवींद्र धंगेकरांची विधानसभेत पहिली लक्षवेधी, पुणेकरांसाठी महत्त्वाची मागणी
पाऊस-पाण्याचा अंदाज

गुढी पाडव्याच्या दिवशी गावात पाऊस पाण्याचा अंदाज सांगण्यात प्रथा आहे. त्यानुसार ग्रामपुरोहित धर्माधिकारी यांनी पंचांगानुसार यावर्षीच्या पाऊस पाण्याचे भाकीत केले. ते म्हणाले, मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात २० जूनला पावसाला सुरुवात होईल. ५ जुलै पर्यंत समाधानकारक पाऊस होऊन खरीप पेरण्या होतील. १५ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत भरपूर पाऊस पडेल, बाजरी, सोयाबीनसह खरीप पिके उत्तम येतील, रोगराई कमी राहील, माणसांचे आरोग्यही चांगले राहील, नकारात्मकता कुठेही नसेल, मृग,आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, पूर्वा, उत्तरा या नक्षत्रांचा खूप पाऊस पडेल,सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडेल असे भाकीत त्यांनी पंचांगाच्या आधारे वर्तविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here