नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात रातोरात विविध ठिकाणी दोन हजार पोस्टर लावल्यामुळे नवी दिल्ली पोलिसांनी १०० एफआयआर दाखल केले आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नवी दिल्लीत विविध ठिकाणी “मोदी हटाव देश बचाव” अशी पोस्टर लावण्यात आली होती. दिल्ली पोलिसांचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आपत्तीजनक पोस्टर्स लावण्यात आले होते, त्यात प्रिंटिंग प्रेसची माहिती नव्हती, असं म्हटलं.

पोलिसांनी या प्रकरणी १०० एफआयआर दाखल करून सहा जणांना अटक केली आहे. पोस्टर्सवर “मोदी हटाव देश बचाओ” असं वाक्य लिहिलं होतं.

दिल्लीतून तातडीनं पोस्टर्स हटवले

“मोदी हटाव देश बचाओ” अशी वाक्य असणारी दोन हजार पोस्टर्स नवी दिल्लीत लावण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणाहून दोन हजार पोस्टर काढून टाकली आहेत. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी १०० एफआयआर दाखल करण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना नंतर जामिनावर सोडून देण्यात आलं आहे.

मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार; छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे

दीपेंद्र पाठक यांनी सांगितलं की, आप कार्यालयातून निघालेल्या ज्या व्हॅनला अडवण्यात त्याच्या चालकाला अटक करण्यात आली होती. मालकानं या ठिकाणी पोस्टर्स पाठवण्यास सांगितल्याचं त्या व्यक्तीनं सांगितल्याचं पाठक म्हणाले. त्या व्यक्तीनं एका दिवसापूर्वी देखील या ठिकाणी पोस्टर्सची डिलिव्हरी पाठवली होती.

मुलीने आईला दिला नवा जन्म; महिलेला सर्पदंश, लेकीने मुखावाटे विष शोषलं, डॉक्टरही म्हणाले वाह!

पोलिसांच्या माहितीनुसार दोन प्रिटिंग फर्म्सना ५०-५० हजार पोस्टर्स बनवण्याची ऑर्डर देण्यात आली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत विविध ठिकाणी पोस्टर्स लावले. पोस्टर्सवर नाव प्रकाशित न केल्यानं प्रिटिंग प्रेसच्या मालकांना देखील अटक करण्यात आली होती.

हजार रुपयात एक ब्रास वाळू, नव्या धोरणामुळे तस्करी हद्दपार, खडीच्या धोरणाबाबतही विखेंचे संकेत

पोलिसांनी प्रिंटिंग प्रेस ॲक्ट आणि प्रॉपर्टी डिफेसमेन्ट ऑफ ॲक्ट नुसार गुन्हे दाखल केले आहेत.विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे

नितीन गडकरी धमकी प्रकरणाचं बेळगाव कनेक्शन, कारागृहातून फोन; १० कोटींसाठी तरुणीचा गुगल पे नंबर, गूढ उकललं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here