आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत.
यावेळी ओशो आश्रमाच्या बचावासाठी अनुयायांनी व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार केला. घडलेल्या या प्रकारानंतर तणाव वाढला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेनंतर ओशो अनुयायांनी आश्रमाबाहेर मोठी गर्दी केली आहे.