चंदीगड: विवाहबाह्य संबंधाचा शेवट हा जास्तकरुन वाईट असतो. अनेकदा त्यामुळे कोणाचा जीव जातो तर अनेकदा यामुळे संसार उद्ध्वस्त होतो. तर जेव्हा या विवाहबाह्य संबंधातील प्रेमीयुगुलातील प्रेम कमी होतं तेव्हा ते एकमेकांचे शत्रू होतात आणि त्यांच्या प्रेमाचे रुपांतर द्वेषात होते. असंच काहीसं हरियाणा येथील कैथल येथे घडली आहे.

कैथल जिल्ह्यातील महिला पोलीस स्टेशन येथे एक प्रकरण नोंदवण्यात आलं आहे. जिथे एका विवाहित महिलेचे तिच्याच दिरासोबत गेल्या ६ वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. या महिलेला मुलंही आहेत. पण, दिराच्या प्रेमात पडलेल्या या महिलेला त्याच्याच सोबत राहायचे होते. म्हणून ती १२ मार्चला दिरासोबत पळून गेली. तीन दिवस ते कुठेतरी लांब अज्ञात स्थाळावर एकत्र राहिले. त्यानंतर प्रियकर दीर तिला पुन्हा घरी सोडून गेला.

३ कोटींची लॉटरी लागली, पैसे घेऊन पत्नी बॉयफ्रेंडसोबत पळाली; मग कहाणीत ट्वीस्ट अन्…
जेव्हा या महिलेला कळालं की तिचा प्रियकर दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे, तेव्हा तिला खूप राग आला आणि तिने प्रियकर दिरावर बलात्काराचा आरोप लावला आहे.

या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे आरोपी दिराने ज्याच्या विरोधात महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तो अविवाहित होता. त्याचे लग्न होणार होते. मात्र, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता तो फरार झाला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलीस छापेमारी करत आहेत.

आईसोबत प्रियकराला बघितलं, त्याची सटकली, मग त्याने जे केलं ते पाहून अख्खं गाव हादरलं…
कैथल महिला पोलीस स्टेशनच्या प्रभारी गीता देवी यांनी सांगितले की, त्यांच्याकडे बलात्कार पीडितेची तक्रार आली होती. तिने तिच्या दिराविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आणि वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता पोलीस आरोपींचा शोध घेत असून, लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं.

माझं स्वप्न पूर्ण झालं; महाराष्ट्राची क्रश असलेली सायली पाटील चाहती म्हणून आकाशच्या प्रेमात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here