गुंतवणूकदाराची एका दिवसात भरमसाठ कमाई
आज बीएसईवर सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज २५७.९५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे त्याच्या मंगळवारच्या व्यवहारात २५६.८९ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे १.०६ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.०६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली असेही म्हणता येईल.
‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात, ‘या’ गोष्टी समजून घ्या
कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी
सेन्सेक्समधील ३० पैकी २१ शेअर्स आज तेजीसह बंद झाले. त्यातही बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.१८ टक्के वाढ नोंदवण्यात आली. यानंतर बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, इंडसइंड बँक आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि ते सुमारे ०.८७% वरून २.१८% पर्यंत वाढीसह बंद झाले.
कुठे आज सर्वाधिक घसरण
सेन्सेक्समधील उर्वरित ९ शेअर्समध्ये आज घसरण नोंदवली गेली, ज्यामध्ये एनटीपीसीचे शेअर्स सर्वाधिक १.७५% घसरले. यानंतर अॅक्सिस बँक, नेस्ले इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
२,०४० शेअर्समध्ये तेजी
बीएसईमध्ये आज एकूण ३,६३१ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यातील २,०४० शेअर्स वधारून बंद झाले. तर १,४५३ शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. तर १३८ शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले.