म. टा. प्रतिनिधी ।

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णांलयांकडून टाळाटाळ होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी खासगी रुग्णालयांना सज्जड दम दिला. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अधिगृहित केलेल्या रुग्णालयांनी रुग्णांवर उपचारास टाळाटाळ केल्यास डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.

करोनाचा संसर्ग वाढत असल्याने सांगलीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत काही खासगी रुग्णालये अधिगृहित केली आहेत. या रुग्णालयांना कोविड उपचारासाठी स्वतंत्र खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र काही रुग्णालयांकडून रुग्णांना प्रवेश दिला जात नाही. खाटा शिल्लक नसल्याचे कारण सांगून माघारी पाठवले जाते. याबाबत तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सोमवारी आढावा बैठकीत चर्चा केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘अधिग्रहीत केलेल्या रुग्णालयातील खाटांचे चार संवर्गात वर्गीकरण केले आहे. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णास ॲडमिट करून घेऊ नये. या रूग्णालयांमधील खाटा केवळ ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांसाठीच वापरल्या जातील. खाटांचे मॉनिटरिंग जिल्हास्तरावरून बेड्स मॅनेजमेंट ॲपव्दारे करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्या हॉस्पिटलमध्ये वर्गीकरणातील कोणत्या प्रकारच्या खाटा उपलब्ध आहेत हे त्वरीत संबंधितांना कळविले जात आहे. रुग्णालयांनी या ॲपवर तंतोतंत खरी माहिती भरावी. पात्र रुग्णांशिवाय इतर रुग्ण दाखल असल्यामुळे पात्र रुग्णाला प्रवेश नाकारल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. खाटा रिक्त असताना रुग्णांना प्रवेश नाकारल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.’

वाचा:

रुग्णांना टाळाटाळ करणा-या मिरजेतील एका रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. नर्सिंग स्टाफवर गुन्हे दाखल झाल्यानंतरही काही रुग्णालयांकडून रुग्णांना सेवा मिळत नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. बैठकीसाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, डॉ. शिशिर निरगुंडे, आदी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here