youth killed by drowning, बेदम मारलं, तलावात फेकलं, तरीही तरुण बुडेना; मग अंगावर विटा टाकल्या; ‘तो’ वाद जीवावर बेतला – group of men takes life of youth by drowning him in pond
बाराबांकी: उत्तर प्रदेशच्या बाराबांकीमध्ये प्रेम प्रकरणातून दीड वर्षांपूर्वी झालेल्या वादातून एका तरुणाचा जीव गेला आहे. एका टोळक्यानं तरुणाला मारहाण करून त्याला तलावात फेकलं. तरुणाला बुडवून मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तरुण बुडत नव्हता. ते पाहून आरोपींनी त्याच्यावर विटा टाकल्या. यानंतर तरुणाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ माजली. अनेक बडे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीनं मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृताच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर दुसऱ्या गटाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी प्रकरणाचा शोध सुरू केला आहे. ही संपूर्ण घटना बाराबांकीमध्ये नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केवाडी गावात घडली. प्रेम प्रकरणातून दीड वर्षांपूर्वी एक वाद झाला होता. त्याच वादातून तरुणाचा जीव गेला. मोहम्मद जसीम असं मृताचं नाव असून तो २३ वर्षांचा होता. कॉलेजनं टॉयलेटमध्ये लावले CCTV; मुख्याध्यापकांनी दिलेलं कारण वाचून डोक्यावर हात माराल मोहम्मद जसीमचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे दीड वर्षांपू्र्वी दोन्ही बाजूंमध्ये कडाक्याचा वाद झाला होता. त्याच वादाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या पक्षानं जसीमवर जीवघेणा हल्ला केला. त्यांनी जसीमला मारहाण केली. त्यानंतर त्याला तलावात फेकलं. जसीम बुडावा यासाठी त्याच्यावर विटा टाकल्या. यामुळे जसीमला पाण्यातून बाहेर पडता आलं नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. जसीम तलावाच्या जवळच दुकान चालवायचा.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
काही जण जसीमला मारहाण करत असल्याचं त्याच्या बहिणीनं घराच्या छतावरून पाहिलं. मारहाणीनंतर त्यांनी जसीमला तलावात ढकललं. त्याच्यावर विटा टाकल्या. जसीमला वाचवण्यासाठी त्याच्या बहिणीनं तलावाजवळ धाव घेतली. तेव्हा आरोपींनी तिलादेखील जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी अनेकदा ठार करण्याची धमकी देत होते. अखेर त्यांनी संधी साधली, असं मृताच्या कुटुंबीयांनी सांगितलं.