घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, अंदाजे ४० फुट खोल असलेल्या विहिरीमधे एक व्यक्ती पडली होती. ती कडेला असणाऱ्या एका दोराला पकडून उभी असून होती. ती खूप भेदरलेल्या स्थितीत होती. जवानांनी त्याला धीर दिला आणि तात्काळ त्याला वाचवण्याच्या कामात लागले.
शॉक लागलेल्या व्यक्तीला वाचवणाऱ्या मुस्लीम बांधवांचा जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडिओ शेअर
जवानांनी मोठी रस्सी, रिंग पाण्यात टाकून जवान किरण पाटील यांना खाली विहिरीत उतरवले. जवान पाटील यांनी विहिरीत अडकलेल्या व्यक्तिशी संवाद साधत त्याला धीर देत त्याच्या कमरेला दोर बांधला आणि रिंगचा वापर करत सदर व्यक्तीला इतर जवानांनी सुखरुप बाहेर काढत त्याची सुखरुप सुटका केली. जवानांनी सुमारे तीस मिनिटात ही कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिकअप टेम्पो वॉशिंग सेंटर येथे आला असता वाहन चालक उतरून बाहेर जाताच विनोद पवार (वय ३५) यांनी टेम्पोत बसून टेम्पोचा रिव्हर्स गियर टाकला आणि अचानक टेम्पोसह पवार विहिरीत पडल्याची घटना घडली.
या कामगिरीत कात्रज अग्निशमन केंद्र अधिकारी संजय रामटेके, वाहनचालक बंडू गोगावले, तांडेल वसंत भिलारे, किरण पाटील, शुभम शिर्के, संकेत शेलार, धीरज जगताप यांनी सहभाग घेतला.