wife suffering from cancer, तू माझा सांगाती! पत्नीला कायम सोबत घेऊन जातो फूड डिलिव्हरीसाठी; कहाणी वाचून डोळे पाणावतील – man takes cancer stricken wife with him for food parcel
गांधीनगर: कर्करोग धोकादायक मानला जातो. औषध विज्ञानानं बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे कर्करोगावर मात करणं शक्य झालं आहे. मात्र त्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असावी लागते. काही जण कर्करोगाशी दोन हात करून त्यावर मात करतात. यासंबंधित बातम्या येत असतात. आता सोशल मीडियावर एका दाम्पत्याची कहाणी व्हायरल झाली आहे. एका व्यक्तीच्या पत्नीला कर्करोग आहे. या आजारामुळे तिच्या मनात सतत नकारात्मक विचार यायचे. त्यामुळे पतीनं एक अनोखा निर्णय घेतला आणि दोघांची कहाणी व्हायरल झाली.
गुजरातमधील जोडप्याची कहाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. राजकोटमध्ये राहणारे केतन भाई चरितार्थ चालवण्यासाठी फूड डिलिव्हरी करतात. केतन यांची पत्नी सोनल कर्करोगाशी लढा देत आहेत. पत्नी एकटी घरी राहून तिच्या मनात नकारात्मक विचार येऊ नयेत यासाठी केतन दररोज सोनल यांना घेऊन दुचाकीवरून फिरतात. सोनल यांचा कर्करोग चौथ्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यांच्यावर ८ वेळा किमोथेरेपी करण्यात आली आहे. अग्निवीरसाठी एकीकडे तरुणांची गर्दी; दुसरीकडे तब्बल ५० हजार जवानांनी नोकरी सोडली; कारण काय? सोनल यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. मात्र या कठीण काळातही केतन हिंमत हरलेले नाहीत. पत्नी घरात एकटी राहू नये म्हणून ते तिला सतत सोबत ठेवतात. दोघे एकत्र फूड डिलिव्हरीसाठी जातात. त्यांना सोबत पाहून अनेक जण त्यांच्याकडे विचारणा करतात. केतन त्यांना आपली परिस्थिती, अडचण सांगतात. केतन यांची कहाणी आणि त्यांचं पत्नीवरील प्रेम पाहून अनेकांचे डोळे पाणावतात.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?
केतन आणि सोनल यांचा २००७ मध्ये प्रेमविवाह झाला. जवळपास ८ महिन्यांपूर्वी सोनम यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू होत्या. त्यामुळे केतन यांनी त्यांना डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या. यातून सोनम यांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. तेव्हापासून सोनम उपचार घेत आहेत. सोनम घरी एकट्या असल्यावर त्यांच्या मनात नकारात्मक विचार येतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्या खचतात. ते टाळण्यासाठी केतन त्यांना स्वत:सोबत दुचाकीवरून सगळीकडे घेऊन जातात. सोनम यांना एकटं ठेवणं ते कटाक्षानं टाळतात.