मुंबई : गुढीपाडव्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडली. “शिवसेना सोडताना नक्की काय झालं, हे शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो. मी उद्धव ठाकरेंना समोर बसवून एकदा विचारलं, की तुला काय हवं आहे, पक्षप्रमुखपद, सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? घे.. पण मला माझा रोल काय आहे ते सांग” असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे काय म्हणाले?

“मी एकदा उद्धव ठाकरेंकडे गेलो, त्यांना म्हटलं गाडीत बसा, आपल्याला बाहेर जायचंय. आम्ही हॉटेल ओबेरॉयला गेलो, उद्धव ठाकरेंना समोर बसवलं, शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतोय, त्यांना विचारलं ‘बोल तुला काय हवंय? तुला अध्यक्ष-प्रमुख व्हायचंय तर हो.. सत्ता आल्यावर मुख्यमंत्री व्हायचंय.. तर हो, जे व्हायचंय ते हो, पण मला सांगा माझं काम काय? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका, जर निवडून आलेल्या लोकांची जबाबदारी घ्यायची नाही, तर पुढच्या वेळी प्रचाराला जाऊन मी काय तोंड दाखवू? उद्धव ठाकरे म्हणाले, मला काही नाही, मी म्हटलं, ठरलं ना? तर ते हो म्हणाले” असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.

“आम्ही घरी आलो. बाळासाहेब झोपले होते, त्यांना सांगितलं सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला. सगळं मिटलं, त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले उद्धवला बोलव. मी म्हात्रे का कोण होते, त्यांना म्हटलं उद्धव ठाकरेंना बोलवा, पाच मिनिटं झाली, पण ते आले नाहीत. नंतर मला सांगितलं उद्धव ठाकरे बाहेर गेलेत. त्रास देऊन ही माणसं कशी पक्षाबाहेर जातील, हेच बघत होते” असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंवर तुफान टीका, फडणवीसांना कळकळीची विनंती, नांदगावकरांची शिवतीर्थावर डरकाळी!

राणे पक्षाबाहेर गेलेच नसते

“नारायण राणे पक्षाच्या बाहेर गेलेच नसते. त्यांना मी फोन केला, काय करताय, मी साहेबांशी बोलतो, जाऊ नका. राणे मला बोलले की, ठीक आहे, बोला साहेबांशी. मी बाळासाहेबांना बोललो की राणेंची इच्छा नाही, त्यांना जाऊ देऊ नका. बाळासाहेब म्हणाले राणेंना घरी घेऊन ये. मी त्यांना निरोप दिला आणि ते निघाले. पण पुढच्या पाचच मिनिटांनी मला फोन आला, त्यांना नको बोलवूस. मला मागे कोणतरी बोलतंय असं कळत होतं” असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.

दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील, हम दो हमारे दो राहतील, मग कुटुंब हीच जबाबदारी : एकनाथ शिंदे

शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा पक्ष काढायचं मनातही नव्हतं. बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा कसं काय. पण मी महाराष्ट्रात फिरलो आणि लोक भेटत गेले तेव्हा वाटलं पक्ष काढला पाहिजे, असं राज ठाकरे सांगत होते.

मनसेला संपलेला पक्ष म्हणालेले, आज त्यांची अवस्था काय? पहिल्याच मिनिटाला राज ठाकरेंचा पुतण्याला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here