राज ठाकरे काय म्हणाले?
मध्यंतरी सांगली, कुपवाड येथून पत्र आलं. इथल्या रहिवाश्यांनी लिहिलं की ‘हा भाग हिंदुबहुल आहे. इथल्या एका मोकळ्या जागेवर मुसलमानांनी अतिक्रमण केलं, आम्ही विरोध केला तर आम्हाला धमक्या दिल्या, त्रास दिला, यावर पोलिसांनी दखल घेतली नाही; तिथे मशीद बांधली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची पसरलेली कबर पुन्हा जागेवर आणली. ह्याबद्दल सरकारचं अभिनंदन राज ठाकरे यांनी केलं.
एकनाथ शिंदेंकडे आता शिवसेना हे नाव आलं, जो विचार बाळासाहेबांचा विचार आहे. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे की मशिदींवरच्या भोंग्यावरच्या आंदोलनाच्या वेळी मागच्या सरकारने माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केलेत, ते गुन्हे मागे घ्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आता मशिदींवरचे भोंगे उतरवा. तुम्हाला जमणार नसेल तर आमच्या कृतींकडे दुर्लक्ष करा. मशिदींवरचे भोंगे आम्ही उतरवून दाखवू, असंही राज ठाकरे म्हणाले.
सरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते आता बघूया, असं म्हणत राज ठाकरेंनी स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवला. “माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?” असा सवाल राज यांनी विचारला.
अमित ठाकरेंना उमेदवारी द्या, आदित्य ठाकरेंविरोधात उभं करा; सचिन खरतांचं थेट राज ठाकरेंना आव्हान
माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. जे होईल ते होईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
देशातील राज्यघटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की, हे तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला ताकद दाखवण्याची इच्छा नाही पण गरज पडली तर ताकद दाखवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असंही राज म्हणाले.