बीड: जवळच्याच नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज उघडकीस आली आहे . या घटनेत आरोपीच्या विरोधात पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे.

महिला व मुलींच्या संरक्षणासाठी सध्या कायदे बळकट करण्यात आले आहे. मात्र तरी देखील बीड जिल्ह्यातील स्त्रियांची अवहेलना ,स्त्रियांवरील अत्याचार , हे कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस स्त्रियांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार उघड होत आहेत. गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार चे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे.

पैसे दुप्पट करून देतो म्हणून ते ३ लाख रुपये घेऊन गेले, पण ठगाचा फसवणुकीचा प्लान अंगलट आला
महिन्याभरापूर्वीच एका तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता . तर त्यानंतर पंधरा दिवसानंतर एका साठ वर्षे वय असलेल्या नराधमानं सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. मात्र अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांकडे राक्षसवाडी येथे आली असताना गावातीलच परमेश्वर गडदे या २६ वर्षीय नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना आज उघडे झाली आहे.

पुण्यातील ओशो आश्रमात राडा, घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांचा लाठीमार
याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस जात पीडीतेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित कलमे आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे या करीत आहेत .या प्रकरणात जरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात येत असले, मोठ्या कलमानुसार यांच्यावर कारवाई देखील होत असली, तरी हे गुन्हे थांबायचं नाव घेत नाही.

कोण आहे ही मुलगी? अमृता खानविलकरने शेयर केला नृत्याचा व्हिडिओ; कोल्हापूरच्या चिमुकलीने मन जिंकलं
दिवसेंदिवस हे गुन्हे थांबवण्यासाठी पोलिसांसमोर नेहमीच एक आव्हान पुढे उभं राहत आहे. आरोपीला ताब्यात घेतले जाते. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला जातो. मात्र असे प्रकार काही थांबायचं नाव घेत नाही . जिल्ह्यातील मुलीवरचा अत्याचार , स्त्रियांवरा अत्याचाराचा आलेख मात्र वाढत जात असल्याचेच चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here