मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपुत यांच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवरील वाद रंगल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणही चांगलंच तापलं आहे. या वादात आता भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. ( case)

दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आयुक्तांना भेटायला जातात, त्यानंतर लगेचच आज पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेतात. काहीतरी गडबड आहे हे न समजण्याइतकी लोकं मुर्ख नाहीत. जसं जसं दिवसं जात आहेत तसे टी गँग पुरावे नष्ट करत आहेत. म्हणून रोज धडपड सुरु आहे, असं ट्विट करत निलेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

एकीकडे भाजपकडून सातत्यानं मुंबई पोलिस व राज्य सरकारवर आरोप होत असताना. आघाडीतील नेत्यांनी मात्र मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचं कुणीही राजकारण करू नये.असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे. तसंच, बिहारच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असून या प्रकरणाला राजकीय रंग देऊन कोणीही राजकीय पोळी भाजू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बिहार पोलिसांना क्वारंटाइन केलं

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई पालिकेने क्वॉरंटाइन केलं आहे. त्यामुळे तिवारी यांना १४ दिवस क्वॉरंटाइन राहावं लागणार असून बाहेर जाऊन तपास करता येणार नाही. बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे काल रविवारी पटना येथून मुंबईत तपासासाठी आले होते. ही माहिती मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी काल रात्री ११ वाजता तिवारी यांना गोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये क्वॉरंटाइन केलं आहे. तसेच तिवारी यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्काही मारण्यात आला आहे. दरम्यान, विनंती करूनही आपल्याला आयपीएस मेस उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here