बारामती : पत्नीच्या वैद्यकीय उपचारांसाठी कर्ज काढू पाहणाऱ्या व्यक्तीची प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ४३ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. तो पैसे परत मागायला आला असता त्याला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याचा प्रकार बारामतीत घडला. या प्रकरणी दोघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र बी. डोंबाळे व ज्योती रवींद्र डोंबाळे (रा. काटेवाडी, ता. बारामती) व अन्य दोघा अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. पांडुरंग दत्तात्रय चव्हाण (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीला पत्नीच्या वैद्यकीय उपचारांसाठी १२ लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी ते कर्जाची चौकशी करीत होते. बारामतीत न्यायालयाशेजारी सुरू असलेल्या बालाजी फायनान्सबाबत त्यांना माहिती मिळाली. ते तेथे कर्ज मिळते का? हे पाहण्यासाठी गेले असता या दोघांची तेथे ओळख झाली. या दोघांनी घर व अडीच गुंठे जागेवर साडेसात लाख रुपयांचे मॉर्गेज लोन करून देतो, असे सांगितले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. कागदपत्रे गोळा करीत फिर्यादीने ती आठवडाभरात बालाजी फायनान्समध्ये जमा केली.

त्यांनी कर्जाबाबत विचारणा केली असता प्रोसेसिंग फी म्हणून ४३ हजार रुपये भरावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादीने या दोघांच्या गुगल व फोन पे खात्यावर स्वतःकडील तसेच त्यांचे मित्र अविराज मोरे यांच्या मोबाईलवरून ही रक्कम जमा केली. त्यानंतर त्यांनी कर्जाबाबत विचारणा केली असता पुढील आठ ते दहा दिवसांत कर्ज मंजूर होईल, असे सांगण्यात आले. परंतु त्यानंतरही टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादीने त्यांना कर्ज द्या अथवा माझी रक्कम परत द्या, असे सांगितले. परंतु ‘आज देतो, उद्या देतो’ अशी आश्वासने देण्यात आली.

बाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुंबईहून मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं
३० जानेवारी रोजी फिर्यादी बालाजी फायनान्सच्या ऑफिसात गेले असता या दोघांसह अन्य अनोळखी दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करीत ‘तुझे पैसे विसरून जा. परत पैसे मागायला आला, तर हात-पाय तोडून टाकीन,’ अशी धमकी देत मारहाण केली.

ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा

त्यानंतरही फिर्यादीने भिगवण रस्त्यावरील या कार्यालयाला भेट दिली असता ते कार्यालयच त्यांनी बंद केल्याचे दिसून आले. पैसे मागण्यासाठी फोन केला असता फोन न उचलून पैसे देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली.

बाबांसोबत राहायला आई तयार होईना, १६ वर्षांची लेक चिडली, भररस्त्यात आईच्या चेहऱ्यावर फेकलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here