सोलापूर:बार्शी निर्भया प्रकरणात संजय राऊतांनी ट्विट करत पीडित मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली होती. या प्रकरणात बार्शी शहर पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत खासदार संजय राऊत यांच्या विरोधात संताप व्यक्त केला होता. पीडित अल्पवयीन मुलीचा फोटो वायरल केला म्हणून खासदार संजय राऊत विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पीडित मुलीच्या आईने माहिती देताना सांगितले खासदार संजय राऊत यांनी आमची बाजू घेतली आहे. राऊत हे आमच्या न्यायासाठी लढत आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भाजपच्या चित्रा वाघ यांनी व्हिडीओ प्रसारित करत न्याय देऊ असे आश्वासन दिले, पण भाजपची एकही नेता फिरकला नाही असे पीडितेच्या आईने सांगितले.

‘संजय राऊत यांचा कॉल आला होता’

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कॉल करुन सोलापूरला येणार असल्याची माहिती पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे बार्शी निर्भया प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. त्यांनी ट्विट केले नसते तर राज्याला काहीच माहिती झाले नसते असे पीडितेच्या आईने माध्यमांना बोलताना माहिती दिली. दोन दिवसांत संजय राऊत सोलापूर येथील रुग्णालयात येणार आहेत. ते माझ्या मुलीची विचारपूस करतील असा विश्वास पीडितेच्या आईने व्यक्त केला आहे.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शोककळा, बाप-लेकाच्या बाइकला ट्रॅव्हल्सची धडक, मुलाचा जागीच मृत्यू
‘भाजपचा एकही नेता आला नाही’

५ मार्च रोजी बार्शीत निर्भया कांड घडले. बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. अत्याचारानंतर पोलीस तक्रार देऊ नको म्हणत संशयित आरोपींनी अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. घटना घडल्यापासून सोलापुरातील एकही भाजप आमदार, भाजप नगरसेवक पीडित मुलीला भेटायला किंवा विचारपूस करण्यासाठी आला नसल्याची महिती पीडित मुलीच्या आईने दिली आहे.

बीडमध्ये संतापजनक घटना! जवळच्या नातेवाईकानेच केला घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
खासदार संजय राऊत यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांवर देखील गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. जे आवाज उठवत त्यांवर गुन्हे दाखल होत असतील तर, आम्हा गरीब लोकांचा कसं होणार अशी भीती देखील पिडीतेच्या आईने व्यक्त केली आहे.

पैसे दुप्पट करून देतो म्हणून ते ३ लाख रुपये घेऊन गेले, पण ठगाचा फसवणुकीचा प्लान अंगलट आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here