ठाणेः मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष यांना तडीपारीची नोटीस आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर परिचारिकांसाठी आंदोलन करत असताना जाधव यांना ही नोटीस मिळाली. न्यायालयाने अविनाश जाधव यांना पोलीस कोठडी सुनावली आली आहे. ठाण्यातील न्यायालयाने अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्यानं, मनसे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अविनाश जाधव यांच्यावर ३५३ कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळ अविनाश जाधव यांना न्यायलयीन कोठडी मिळाली असून त्यांची रवानगी तळोजाला करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशामनुसार सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून ६ ऑगस्टला याबाबत सुनावणी होणार असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

वाचाः

या सगळ्या घडामोडीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरेंच्या सूचनेनुसार, नांदगावकर यांनी ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. तसंच, अविनाश जाधव यांना निरोपही पाठवला. ‘अविनाश, मै हू ना’ अशा शब्दांत राज यांनी जाधव यांना धीर दिला.

वाचाः

दरम्यान, वसई-विरार महापालिकेत आंदोलन केल्याप्रकरणी जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालानं जाधव यांना ४ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर परिचारिकांसाठी आंदोलन करत असताना जाधव यांना ही नोटीस मिळाली. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यास सांगितलं आहे. लोकांच्या हितासाठी आंदोलन करत असल्यामुळं राज्य सरकारनं बक्षीस दिल्याचं जाधव यांनी म्हटलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here