राजापूर, रत्नागिरी : कोकणात प्रस्तावित असलेल्या राजापूर येथील रिफायनरीवरून आता पुन्हा रान पेटण्याची शक्यता आहे. बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाच्या जागेवरती विदर्भातील नागपूर येथील काँग्रेसचे माजी आमदार आशिष रणजित देशमुख यांच्यासह अनेक बाहेरच्या लोकांनी जागा खरेदी केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हे समोर आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव समीर शिरवाडकर यांनी ही सगळी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात मिळवली आहे. या सगळ्याची माहिती देणारा एक ई-मेल शिरवाडकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे १६ मार्चला केला होता. आपला ई-मेल अर्ज प्राप्त झाला असून पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे, असा रिप्लायही मुख्यमंत्री कार्यालयाकडून शिरवाडकर यांना आला आहे. या सगळ्या जमीन खरेदीच्या व्यवहारात राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी व परप्रांतीयांचा समावेश असल्याचा आरोप शिरवाडकर यांनी केला आहे.

यामध्ये विदर्भातील काँग्रेसचे नेते माजी आमदार आशिष रणजीत देशमुख यांच्या नावावर जवळपास सुमारे १८ एकर जमिनीची खरेदी करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी २०२२मध्ये हा जमीन खरेदीचा व्यवहार झाला आहे. यासह काही बड्या पदावरील अधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि परराज्यातील लोकांनीही जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रकल्प येण्यापूर्वीच जमीन खरेदी नेमकी कोणत्या उद्देशाने झाली? याबाबत उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

राजापूर तालुक्यातीलच बारसू आणि सोलगावसह आसपासच्या गावामध्ये ही जमीन खरेदी केली गेली आहे. दरम्यान मागील दोन वर्षांमध्ये शेकडो एकर जमीन खरेदीचे व्यवहार याभागात झाल्याची बाबही माहिती अधिकारातून उघड आली आहे. याआधी रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये प्रस्तावित असताना त्यावेळीही प्रकल्पाच्या जवळच्या जमिनींचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

रिफायनरी प्रस्तावित असलेल्या जवळच्या जमिनींचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. स्थानिकांनी केलेल्या विरोधानंतर रिफायनरी कोकणातून नाणार बारसू- सोलगाव आणि परिसरात सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, कोकणात रिफायनरी प्रकल्प नकोच, अशी मागणी रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेकडून होत आहे. बारसू- सोलगाव आणि जवळच्या गावातील काही नागरिकांनी रिफायनरीला विरोध केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव समीर शिरवडकर यांनी मिळवलेल्या माहितीमध्ये पुढील नावांचा समावेश आहे. आशिष रणजित देशमुख- सुमारे १८ एकर, दुर्गा अनिल कुमार डोंगरे – १३७ गुंठे, अखिलेश हरिश्चंद्र गुप्ता आणि नमिता अखिलेश गुप्ता – ९२ एकर, आकांक्षा संजय बाकाळकर – ११३ गुंठे, धार्मिल झवेरी – ३ हेक्टर, सोनल पिकेश शहा – ७.५ हेक्टर, विकेश वसंतलाल शहा – १५६ गुंठे,७ ) निकेश शहा – ३ हेक्टर, रुपल विनीतकुमार शहा – ४ हेक्टर, अपर्णा तेजस शहा – १० हेक्टर, देवेंद्र शर्मा – ४.५ हेक्टर, अनुराधा रेड्डी – ५ हेक्टर, सोनल शहा – २ हेक्टर, श्रीकांत मिश्रा – २ हेक्टर, देवेंद्र शर्मा – ६ हेक्टर, शशिकांत वालचंद शहा – ४.५ हेक्टर, नरेंद्र सिसोदिया – ४.५ हेक्टर
मुख्य बाब म्हणजे शहा कुटुंबीयांच्या जमीन खरेदीवर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत कागदपत्र पडताळल्यानंतर त्यावर रायगड जिल्ह्यातल्या सुधागडमधील पाली या ठिकाणचा पत्ता आढळून येतो, असा संशय व्यक्त केला आहे.

दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील, हम दो हमारे दो राहतील, मग कुटुंब हीच जबाबदारी : एकनाथ शिंदे

दरम्यान, हे सगळे व्यवहार कायदेशीर रजिस्टर्ड खरेदीखताने झाले असले तरी कोकणातील मूळ जमीन मालकांकडून कवडीमोल दराने या जमिनी विकत घेऊन त्या मोठ्या उद्योगांना विकण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते समीर शिरवाडकर यांनी केला आहे. त्यामुळे या सगळ्या जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. या सगळ्या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता संघ शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहितीही माहिती अधिकार कार्यकर्ते समीर शिरवाडकर यांनी दिली.
किरकोळ वादाचा सूड, कोकणातील तरुणाची पुण्यात हत्या, दोन तासात तीन संशयित ताब्यात

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

3 COMMENTS

  1. I want to show thanks to this writer just for rescuing me from this particular difficulty. Right after researching through the internet and coming across things which are not pleasant, I was thinking my entire life was done. Living without the presence of approaches to the difficulties you have resolved as a result of your good short post is a serious case, as well as those that would have in a wrong way affected my entire career if I hadn’t noticed your web page. Your own training and kindness in playing with all the stuff was vital. I am not sure what I would’ve done if I had not come across such a point like this. I’m able to at this point relish my future. Thanks very much for the skilled and result oriented help. I will not think twice to suggest your web blog to any person who needs and wants care on this matter.

  2. I have to show some appreciation to you for bailing me out of this particular challenge. After surfing throughout the the web and seeing techniques which are not helpful, I assumed my life was over. Being alive without the presence of answers to the difficulties you’ve solved by means of this review is a crucial case, and those that might have in a wrong way affected my entire career if I hadn’t come across your blog post. The natural talent and kindness in taking care of all the pieces was invaluable. I don’t know what I would have done if I had not come upon such a step like this. I can also now relish my future. Thanks a lot very much for the reliable and sensible guide. I will not be reluctant to refer your web blog to any person who desires care on this problem.

  3. Thanks so much for providing individuals with a very wonderful opportunity to check tips from here. It can be very kind and full of a good time for me and my office acquaintances to visit your web site minimum 3 times every week to study the newest items you will have. And of course, we are certainly fascinated concerning the exceptional suggestions you serve. Some 4 ideas in this post are undoubtedly the most impressive we have had.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here