मुंबई : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाने जागतिक कमोडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. खनिज तेल दरवाढीची झळ भारताला बसत असून पेट्रोलियम कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोल १५ पैसे आणि डिझेल १८ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ८१ रुपये २८ पैसे झाला आहे. तर डिझेल प्रति लीटर ७२ रुपये २ पैसे झालं आहे.

सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा कायम ठेवला. सलग पाचव्या सत्रात पेट्रोल आणि डिझेल महागले. दिल्लीत पेट्रोल दरात सोमवारी दरात १५ पैशांची वाढ झाली आहे. डिझेल १७ पैशांनी महागलं आहे. पेट्रोलचा दर ७५.६९ रुपये आणि डिझेल ६८.६८ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल १५ पैसे आणि डिझेल १८ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ८१ रुपये २८ पैसे झाला आहे. डिझेल दर प्रति लीटर ७२ रुपये २ पैसे झालं आहे. चेन्नईत पेट्रोल १६ पैशांनी महागले असून दर ७८.२८ रुपये झाले आहे.डिझेलचा दर ७२.५९ रुपये असून त्यात रविवारच्या तुलनेत १९ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात पेट्रोल ७८.२८ रुपये आणि डिझेल ७१.०४ रुपये आहे.

अमेरिका आणि इराण एकमेकांसमोर उभे ठाकले असून जगभर युद्धाचे सावट आहे. यामुळे आखाती देशातील खनिज तेल उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या अस्थिरतेने नजीकच्या काळात खनिज तेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कमोडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव प्रति बॅरल ७० डॉलरपर्यंत गेला आहे. यात सोमवारी प्रति बॅरल २ डॉलरची वाढ झाली. यामुळे भारतीय तेल कंपन्यांना आयातीसाठी जादा खर्च करावा लागणार आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयात होणारे अवमूल्यन कंपन्यांची डोकेदुखी वाढवणारी आहे.

प्रमुख शहरांमधील प्रति लीटर पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

शहर पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
मुंबई ८१ . २८ ७२. ०२
दिल्ली ७५.६९ ६८.६८
चेन्नई ७८.२८ ७२.५९
कोलकाता ७८.२८ ७१.०४

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here