मुंबईः राज्यात करोनाचं थैमान सुरु असताना राज्य सरकारनं ४ महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरळीत करण्यासाठी देशभरात मिशन बिगिन अगेनच्या पुढील टप्प्याची सुरुवात झाली आहे. मिशिन बिगिन अगेन अंतर्गंत मुंबईतील सर्वच दुकाने आता सुरु राहणार आहेत.

लॉकडाऊन हटवल्यानंतर काही नियम व अटींसह मुंबईतील दुकानं पुन्हा सुरु करण्यास सरकारनं परवानगी दिली होती. सम व विषम या तत्वावर दुकानं सुरु करण्यात आली होती. मात्र, आज पालिकेनं जारी केलेल्या नवीन पत्रकानुसार सरसकट सगळ्याच दुकान उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत पाच ऑगस्टपासून रस्त्यांच्या दोन्ही बाजूची सर्व दुकानं सुरू होणार आहेत. त्याचबरोबर दारूची विक्री करणाऱ्या दुकानांना काउंटर विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वाचाः

दरम्यान, ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही अटींवर जीम सुरू करण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. याबाबत मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वात मोठा निर्णय म्हणजे मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर येत्या ५ ऑगस्टपासून राज्यात मॉल्स उघडणार आहेत. त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल खुले राहतील. मॉलमधील थीएटर्स, फूड कोर्ट्स आणि रेस्टॉरंट उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातही काही प्रमाणात दिलासा देताना रेस्टॉरंट आणि फूड कोर्टचे किचन सुरू ठेवण्याची व होम डीलिव्हरीची मुभा मात्र देण्यात आली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here