साईबाबांच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात, भक्तांची अलोट गर्दी
राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संस्थान दर्शनरांगेत अधिकृतरित्या फुलविक्री सुरू करण्यात येईल, पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करावी. शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅंडीग सेवा सुरू होणार आहे. सव्वा पाचशे कोटींच्या नवीन टर्मिनस इमारतीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या विमानतळावर एकाचवेळी दहा विमाने थांबतील. याचबरोबर समृद्धी महामार्गामुळे आजूबाजूच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. शिर्डीच्या उत्पन्नात भर पडणार आहे, अशी विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना घरपोच वाळू
सरकारी वाळू लिलाव बंद करण्यात येऊन शेतकऱ्यांना घरपोच जागेवरच ६०० रूपये ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. यातून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व पाणंद व शिवरस्ते मोकळे करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. शेतजमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत रोव्हर तंत्रज्ञानाने मोजणी करून शेतकऱ्यांना नकाशा प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रम अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे, असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी सांगितलं.
साईबाबा समाधी मंदिराच्या कळसावर उभारण्यात आली गुढी