बाजाराच्या सुरुवातीचे संकेत
आज, आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी सत्र सुरू होण्यापूर्वीच देशांतर्गत शेअर बाजारावर दबाव स्पष्ट दिसून येत होता. सिंगापूरमध्ये, NSE निफ्टी, SGX निफ्टीचे फ्युचर्स सकाळी सुमारे ४७ अंक किंवा ०.२७ टक्क्यांनी घसरले ज्यामुळे देशांतर्गत बाजाराची सुरुवात खराब होणार असल्याचे संकेत मिळेल. त्याच वेळी, बाजारातील गोंधळाचा बॅरोमीटर, इंडिया विक्स १.८२% घसरला. तर प्रो-ओपन सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही चिन्हात व्यवहार करत होते. सत्र सुरू होण्यापूर्वी सेन्सेक्स दीडशेहून अधिक अंकांनी तर निफ्टीही जवळपास ५५ अंकांनी कोसळला.
गुंतवणूकदारांमध्ये भीती
देशातील बँकिंग संकटाच्या पार्श्वभूमीवर यूएस केंद्रीय बँकेने आपल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर व्याजदरात ०.२५ टक्के म्हणजे २५ बेस पॉईंटनी वाढ करण्याची घोषणा केली. याशिवाय फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आणखी वाढ करण्याचे संकेत दिले असून त्यांनी म्हटले की व्याजदरात अतिरिक्त वाढ योग्य ठरेल. आगामी काळात व्याजदरात आणखी वाढ होण्यास वाव असल्याचे हे स्पष्ट संकेत आहे. आता अमेरिकेत धोरणात्मक व्याजदर ५५ झाला असून जून २००६ नंतरची ही अमेरिकेतील सर्वोच्च पातळी आहे. त्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात विक्री करत आहेत.
जागतिक बाजाराची स्थिती
फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर काल अमेरिकन बाजारात देखील मोठी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी, डाऊन जोन्स सुमारे १.६३%, तर एस अँड पी ५०० १.६५ टक्के आणि तंत्रज्ञान-केंद्रित नॅस्डॅक कंपोझिट १.६० टक्क्यांनी गडगडला. याशिवाय आजच्या व्यवहारात आशियाई बाजारही घसरले. जपानचा टॉपिक्स निर्देशांक ०.१ टक्क्यांनी खाली पडला तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.७ टक्के आपला असून हाँगकाँगचा हँगसेंग फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये ०.८ टक्क्यांनी वधारला आहे.
सेन्सेक्स-निफ्टीचे शेअर्स
सेन्सेक्सबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीच्या ट्रेडमध्ये फक्त १० कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी राहिली, तर उर्वरित २० कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी सारखे मोठे समभाग ०.१ टक्क्यांपर्यंत घसरले असून बँकिंग, वित्त आणि तंत्रज्ञान समभागांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.