चेन्नई: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेत भारताचा पराभव झाला आहे. भारताने चेन्नईमध्ये खेळवला गेलेला तिसरा निर्णायक सामना २१ धावांनी पराभूत होत मालिकादेखील २-१ अशा फरकाने गमावली आहे. या सामन्यातही भारताची फलंदाजी बाजू पुन्हा ढासळली आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी आपले विकेट गमावत पुन्हा निराश केले आहे. सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला पाहूया.

काय म्हणाला कर्णधार

दुसऱ्या वनडेनंतर तिसऱ्या वनडेतही झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला – “मला वाटत नाही की आमच्यासमोर मोठी धावसंख्या होती. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. भागीदारी महत्त्वाची आहे आणि आज आम्ही ती करू शकलो नाही. तुम्ही या प्रकारच्या विकेट्सवर खेळून पुढे आला आहात. डावाच्या चांगल्या सुरुवातीनंतर फलंदाजाने तोच खेळ पुढे नेणे महत्ताचे होते. पण तसे घडले नाही. अशावेळेस तुमच्या रणनिती बनवून त्यानुसार खेळणे महत्त्वाचे होते.”
टीम इंडियाच्या स्वप्नांना धक्का? WTC फायनल, वनडे वर्ल्डकपआधी आली टेन्शन वाढवणारी बातमी
पुढे सांगताना कर्णधार म्हणाला, “या मालिकेतून बऱ्याच गोष्टी शिकून पुढे जात आहोत. आम्ही जानेवारीपासून खेळलेल्या ९ वनडे सामन्यांतून अनेक सकारात्मक गोष्टी घेऊ शकतो. आम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे, हे आधी समजून घ्यावे लागेल. हि सर्वांचीच हार आहे, आम्हाला या मालिकेतून खूप शिकता येईल. ऑस्ट्रेलियाला या विजयाचे श्रेय मिळायला हवे, त्यांच्या दोन्ही फिरकीपटूंनी आणि आणि त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी आमच्यावर दबाव कायम ठेवला होता.”

भारताचे फलंदाज

अंतिम सामन्यात २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ विराट कोहलीलाच अर्धशतक झळकावता आले, बाकीचे फलंदाजही संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊ शकले नाहीत. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला, तर रोहित शर्मा ३०, शुभमन गिल ३७, केएल राहुल ३२, अक्षर पटेल २, हार्दिक पंड्या ४० आणि रवींद्र जडेजा १८ धावांवर बाद झाले. टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा लाजिरवाणा रेकॉर्ड आता चिंतेचा विषय बनला आहे.

विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन

भारताने २०१९ नंतर भारतीय भूमीवर द्विपक्षीय वनडे मालिका गमावली आहे. ऑस्ट्रेलिया मागे एकदाच भारताला २-३ च्या फरकाने भारतीय भूमीवर मात दिली होती. पण त्यानंतर भारताने सलग ७ वनडे मालिका जिंकल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here