अदानी समूहावर हिंडेनबर्गचा वार
हिंडेनबर्गने २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये शेअर्सच्या किमतींशी छेडछाड करण्यासोबत फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते. अदानी समुहावरील हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांची संपत्ती १५० अब्ज डॉलरवरून $५३ अब्ज इतकी शिल्लक राहिली आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत अदानी तिसऱ्या क्रमांकावरून ३५व्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्याचवेळी गौतम अदानी यांच्या समूहाला १२० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले.
हिंडेनबर्ग नवीन धमाका करणार
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात गौतम अदानी यांच्या समुहाबाबत मोठा खुलासा केल्यानंतर आता हिंडेनबर्गने आणखी एक मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहेत. हिंडेनबर्गए ट्विट करून याबाबत माहिती दिली असून लवकरच एक नवीन अहवाल येत असून या अहवालातून अनेक मोठे खुलासे होतील असे दिसत आहे. कंपनीचे ट्विट केल्यावरच अनेक ट्विटर यूजर्सनी अंदाज बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. तर बरेच यूजर्स अमेरिकन बँकांबद्दल नवीन अहवाल असल्याचा अंदाज बांधत आहेत.
अदानीच नव्हे हे देखील बनले हिंडेनबर्गचे शिकार
दरम्यान, फक्त अदानी समूहच नाही, तर अनेक अमेरिकन कंपन्यांवर हिंडेनबर्गने अहवाल प्रकाशित केला आहे. कंपनीने सप्टेंबर २०२० मध्ये इलेक्ट्रिक ट्रक बनवणाऱ्या निकोला कॉर्पवर अहवाल सादर केला होता, ज्यानंतर कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. अशा स्थितीत अदानी समूहावर रिपोर्ट जारी केल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये कोसळले, ज्यामुळे अदानी ग्रुपचे मार्केट कॅप $१२० अब्जवर घसरले.
हिंडेनबर्ग रिसर्च म्हणजे काय?
हिंडेनबर्ग एक आर्थिक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटवरील डेटाचे विश्लेषण करते. याची स्थापना २०१७ मध्ये नॅथन अँडरसनने केली असून शॉर्ट सेलर कंपनी हेज फंड व्यवसाय देखील चालवते. हिंडेनबर्ग रिसर्च कॉर्पोरेट विश्वातील क्रियाकलापांबद्दल खुलासे करण्यासाठी ओळखले जाते. कंपनीचे नाव १९३७ मध्ये झालेल्या हिंडेनबर्ग अपघातावर ठेवण्यात आले आहे, जेव्हा एका जर्मन प्रवासी विमानाला आग लागली आणि ३५ लोकांचा मृत्यू झाला.