बुधवारला पहाटेला मंदिरामध्ये या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. मंदिरातील दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर फोडलेल्या स्थितीत आढळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी स्वानपथक बोलावले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Home Maharashtra chandrapur crime news today in marathi, धक्कादायक! पहाटे मंदिरात दर्शनासाठी जाताच पाहिला...
chandrapur crime news today in marathi, धक्कादायक! पहाटे मंदिरात दर्शनासाठी जाताच पाहिला रक्ताचा पाठ, नंदीजवळ दोघांचे मृतदेह अन्… – two murders in chandrapur bloody bodies found in temple
चंद्रपूर : राज्यात गुन्ह्यांच्या घटना वाढल्या असताना महाराष्ट्राला हादरवणारी घटना चंद्रपुरात समोर आली आहे. इथे चक्क मंदिरात दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली गावात जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आली. यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे.