नाशिकः अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी केलेल्या ट्विटमुळं नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यावर यांनी भाष्य केलं आहे. अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट हे सुशांत सिंह राजपूत यांच्याविषयी आहे. या ट्विटचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये, असं स्पष्टीकरणं त्यांनी दिलं आहे. तसंच, मुंबई सुरक्षित आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही, पण, सुशांत सिंह राजपुत आत्महत्येप्रकरणी जनतेला उत्तर हवं आहे, असंही ते म्हणाले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. तपासासाठी आलेल्या बिहारच्या पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाइन केल्यानंतर भाजपनं या मुद्द्यावर राज्य सरकारला घेरलं आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.

वाचाः

मुंबई पोलिसांवर कोणताही आरोप नाही, माझ्याकडे गृहमंत्रीपद असताना याच पोलिसांसोबत मी काम केलंय. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस चांगलं काम करत आहेत. मात्र, कधी कधी राजकीय दबावामुळं पोलिसांच्या कामात खंड पडू शकतो. असंही ते म्हणाले.

वाचाः

देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूतच्या चौकशीवरून सरकारच्या भूमिकेवरून टीका केली आहे .’राज्य सरकार बिहार पोलिसांना त्यांचं कर्तव्य न बजावू देता अनावश्यक संशयाच्या भोवऱ्यात का पडत आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.’

केरळमधील वैद्यकीय पथकानं मुंबईला भेट दिली. उत्तर प्रदेश पोलिस विकास दुबे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आले होते, तसंच, बिहार पोलिसांची एक टीम आधीपासूनच मुंबईत कार्यरत आहे. पण त्यापैकी कुणालाच अडचणीत आणलं गेलं नाही. फक्त बिहारच्या पोलिस अधिक्षकांनाच वेगळी वागणूक का? या वागणूकीमुळं सुशांतच्या मृत्यूचे गूढ सुटण्याऐवजी लोकांच्या मनात संशय निर्माण होईल, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा ज्या तऱ्हेने तपास सुरू आहे, त्यावरून मुंबईने माणुसकी गमावलीय असं मला वाटत आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here