मुंबई : आजकाल लोक त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. परंतु कर्ज देण्यापूर्वी बँका तुमचा सिबील (CIBIL) स्कोअर तपासतात. कारण या आधारावर तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. सिबील स्कोअर ३०० ते ९०० पर्यंत आहे. साधारणपणे सिबील स्कोअर ७५० किंवा त्याहून अधिक चांगला मानला जातो.

सिबील स्कोअर खूप कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे खूप अवघड होऊन बसते आणि ते मिळाले तरी तुम्हाला ते खूप व्याजाने मिळते. तुमचा सिबील स्कोअर देखील बिघडलेला असेल आणि पैशांची गरज असेल, कर्ज मंजूर होत नसेल, तर इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही स्वतःसाठी पैशांची व्यवस्था करू शकता. त्याबद्दल जाणून घ्या.

कर्जदारांनो, लक्ष द्या! आता WhatsApp वर मोफत तपासू शकता तुमचा क्रेडिट स्कोर, वाचा संपूर्ण प्रक्रिया
संयुक्त कर्ज
तुमचे उत्पन्न चांगले असल्यास तुम्ही संयुक्त कर्जाची निवड देखील करू शकता किंवा सिबील स्कोअर कमी असल्यास एखाद्याला तुमचा जामीनदार बनवू शकता. तुमच्या संयुक्त कर्ज धारकाचा किंवा जामीनदाराचा सिबील स्कोअर चांगला असेल तर तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता. याचा एक फायदा असा आहे की तुमची सह-अर्जदार महिला असेल तर तुम्हाला व्याजदरातही काही फायदा मिळू शकतो.

पगारावर कर्ज
तुमच्या क्रेडिट स्कोअर व्यतिरिक्त सर्व वित्तीय संस्था कर्ज देताना तुमचा पगार पाहतात. तुमचा सिबील स्कोर कमी असेल, तर तुम्ही पगार, वार्षिक बोनस किंवा इतर अतिरिक्त उत्पन्न स्त्रोताचा पुरावा देऊन बँक किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊ शकता. कारण याद्वारे तुम्ही हे सिद्ध करू शकता की तुम्ही कर्जाची परतफेड करण्यास पूर्णपणे सक्षम आहात. याशिवाय तुम्ही जेथे काम करता तेथे तुम्हाला अनेक वेळा अॅडव्हान्स पगार घेण्याचा पर्यायही मिळतो. तुम्हाला हवे असल्यास अॅडव्हान्स पगार घेऊन तुम्ही तुमचे काम चालवू शकता.

CIBIL स्कोअर चांगला असणे का महत्वाचे? जास्त पगार असूनही कर्ज देण्यास नकार देते बँक
बँक एफडीवर कर्ज
तुमची बँकेत एफडी जमा असेल आणि तुम्हाला ती आता खंडित करायची नसेल, तर तुम्ही त्या FD वर बँकेकडून कर्ज घेऊ शकता. बँका एफडीवर जमा केलेल्या रकमेच्या ९० ते ९५% कर्ज म्हणून देतात. दुसरीकडे ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असेल, तर तुम्ही या सुविधेअंतर्गत ठेव रकमेच्या ९०% रक्कम घेऊ शकता. कर्जाची ही रक्कम सुरक्षित कर्जाच्या श्रेणीमध्ये ठेवली जाते. कारण बँक कर्जाच्या बदल्यात एफडी गहाण ठेवते. एफडी कर्जावर एफडी दरापेक्षा २ टक्के जास्त व्याज असते मात्र, यासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क नाही. कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवरच व्याज आकारले जाते.

तुम्ही तुमचा CIBIL स्कोर वारंवार तपासता? मग आत्ताच थांबा नाहीतर…
NBFC देखील पर्याय
तुम्हाला कर्जाची खूप गरज असेल तर तुम्ही बिगर बँकिंग वित्तीय संस्थेत देखील कर्जासाठी अर्ज करू शकता. तुमचा स्कोअर कमी असला तरीही इथून तुम्हाला कर्ज मिळू शकते. येथे कर्जाचा व्याजदर बँकेपेक्षा जास्त असू शकतो.

सोने कर्ज
तुमच्याकडे सोने असेल तर तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता. गोल्ड लोन हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवले जाते. तुम्हाला सध्याच्या सोन्याच्या किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यात फारशी कागदपत्रे किंवा तुमचा सिबील स्कोअर पाहिला जात नाही. तुमचे कर्ज तारण ठेवून हे कर्ज दिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here