चेन्नई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडेमध्ये कांगारूंनी शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. या पराभवासह २०२३ मधील विजयाचा विजय रथ भारताचा इथे थांबला. यानंतर आता पुन्हा टीम इंडियाच्या फलंदाजीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. या सामन्यात टी-२० चा किंग सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि सलग तिसऱ्यांदा बाद झाला.

सूर्यकुमार यादवचा हा फॉर्म पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं आहे. पण या सामन्यात एक विचार करण्यासारखी गोष्ट घडली ती म्हणजे सूर्यकुमार ज्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. या सामन्यात त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजी देण्यात आली होती जी कोणालाच समजली नाही. आता कर्णधार रोहित शर्माने यावर मौन सोडले असून या बदलामागील कारण सांगितले आहे. खराब फॉर्म असूनही रोहितने पुन्हा एकदा आपल्या सहकारी खेळाडूला साथ दिली आहे.
VIDEO: तिसऱ्या वनडेत कोहली दिसला अ‍ॅक्शन मोडमध्ये, सामना सुरु असतानाच स्टॉयनिससोबत भिडला
काय म्हणाला रोहित

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला – ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादव केवळ तीन चेंडू खेळू शकला हे आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. हे कोणाहीसोबत घडू शकतं. तीन उत्कृष्ट चेंडूंवर तो आऊट झाला, या सामन्याबद्दल बोलयाचं तर चुकीचा शॉट मारत सूर्या आऊट झाला.

तो पुढे म्हणाला – ‘आम्ही त्याला आधीपासून ओळखतो, तो फिरकीविरुद्ध शानदार फलंदाजी करतो. म्हणूनच आम्ही त्याला नंतरसाठी थांबवून ठेवले होते, जेणेकरून तो शेवटच्या १५-२० षटकांमध्ये खुलून फलंदाजी करू शकेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्माने फलंदाजांवर काढली भडास, सुनावले खडे बोल
सूर्याबद्दल तो पुढे म्हणाला, ‘हे कोणासोबतही घडू शकतं, पण त्यांच्यामध्ये पण त्याच्यामध्ये तेवढी क्वालिटी आहे आणि त्यात क्षमताही आहे. तो फक्त सध्या या सगळ्यातून जात आहे.’ पहिल्या दोन्ही सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणारा सूर्यकुमार यादव तिसऱ्या वनडेत सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. एश्टन अगरच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव क्लीन बोल्ड होत तंबूत परतला.

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली

आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, सलग तीन गोल्डन डक वर बाद होणारा सूर्या जगातील १४वा फलंदाज ठरला. या यादीत अ‍ॅलेक स्टीवर्ट, अँड्र्यू सायमंड्स आणि शेन वॉटसन यांच्या नावांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here