अलीकडेच सोन्याच्या किंमतीने ६० हजार रुपयांची पातळी ओलांडली होती. मात्र, विक्रमी पातळीवरून आता सोन्याच्या दरात पुन्हा घट दिसून येत आहे. तसेच येत्या काळात सोने ६५,००० रुपयांचा विक्रम करू शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सोने आणि चांदीचा नवीन भाव
सोन्याच्या खरेदीसाठी तुम्ही बाहेर पडणार असाल तर पहिले त्याच्या किंमती तपासून घेणे गरजेचे आहे. आजच्या व्यवहार सत्रात सोन्याचा दर आज रु. ५९,००० प्रति १० ग्रॅमच्या स्तरावर परतला तर चांदीचाच्या दरांनी आज सकाळच्या व्यवहारात ७ आठवड्यांच्या उच्चांकावर उसळी घेतली आहे. सोन्याचा भाव आज रु. ५९,२३१ वर उघडला आणि सकाळच्या सत्रात रु. ५९,२८३ प्रति १० ग्रॅम पातळीच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला.
कल्याणमधील सराफाला दोन महिलांनी घातला लाखोंचा गंडा; दागिने केले लंपास
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
जागतिक बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये आज सोन्याचा भावात चढ-उतार होऊन प्रति औंस $१,९७६ या इंट्राडे उच्च पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे, चांदीचे दर आज वाढीसह उघडले आणि MCX वर रु. ६९,८०० प्रति १० किलोसह इंट्राडे ट्रेड सत्रात ७ आठवड्यांचा उच्चांक गाठला. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव ०.२५ टक्के घसरून २२.९ डॉलर प्रति औंसवर आला आहे.
सोन्याच्या दरवाढीचे कारण काय?
अमेरिकेसह इतर देशांमधील बँकिंग संकट, डॉलरच्या दरात कमी, सेफ हेव्हन डिमांड आणि शेअर बाजारातील अनिश्चितता यांना अलीकडेच सोन्याच्या किमती वाढण्याचे कारण मानले जात आहे. बाजारातील घसरणीमुळे सोन्याला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आठवडाभरापूर्वी किंमत ५५,००० रुपयाच्या आसपास व्यवहार करणाऱ्या सोन्याने अलीकडेच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत विक्रमी वाढ नोंदवली होती.