नवी दिल्ली: केंद्र सरकारने च्या कालावधीत () जिम आणि योग संस्था (Yoga institutes Guidelines) सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ५ ऑगस्टपासून जिम आणि योगसंस्था सुरू होत आहेत. या बरोबरच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या ठिकाणांवर करोनाचा संसर्ग (Corona in India Updates) रोखण्यासाठी सुरक्षात्मक नियम जारी केले आहेत. दरम्यान देशभरात करोना रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली असून ३८ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ( & Gymnasiums)

या नियमांचे करावे लागणार पालन
>> योग आणि जिममध्ये लोकांसाठी पुरेशी जागा असावी. सोशल डिस्टन्सिंगसाठी मशीन आणि इतर गोष्टींमध्ये योग्य ते अंतर असावे.

>> जर परिसराबाहेर जागा असेल तर तेथे उपकरणे ठेवण्याची व्यवस्था करावी.

>> परिसरात येण्यासाठी आणि जाण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांचा वापर करावा. या व्यतिरिक्त रांगांचे व्यवस्थापन करण्याची सिस्टमचा वापर करावा आणि कमीतकमी ६ फुटांचे अंतर राहील हे पाहावे.

>> पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस सिस्टमचा ( स्पर्श होणार नाही अशी पद्धत) वापर केला जावा.

>> एसी/ व्हेंटिलेशनच्या वापरासाठी CPWD च्या नियमांचे पालन करावे. सर्व एसीचे तापमान २४ ते ३० डिग्रीदरम्यान असावे. अशा प्रकारे ह्यूडीटीचा स्तर ४० ते ७० टक्क्यांपर्यंत असावा. ताजी हवा येण्यासाठी अधिक जागा असावी आणि व्हेंटिलेशनसाठी पुरेशी जागा असावी.

>> जिममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असावी. लॉकरचा वापर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत केला जाऊ शकतो.

>> डस्टबीन आणि ट्रॅश केन नेहमीच झाकलेले असावेत.

>> परिसराचे सतत निर्जंतुकीकरण केले जावे. कर्मचारी आणि लोकांनी ज्याचा वापर केला आहे असे प्रवेशद्वार, बिल्डिंग, खोल्या, वॉशरूम, शौचालये आणि इतर सामानांचे सतत निर्जंतुकीकरण केले जावे.

वाचा:

जिम आणि योगसंस्थांनी असे करावे प्लॅनिंग

>> जास्तीत जास्त क्षमतेचे मूल्यांकन करून या संस्थांनी वेळेचे नियोजन करावे आणि त्याबाबत सदस्यांना माहिती द्यावी.

>> योग क्रिया काही काळासाठी स्थगित करावी. जर ती करणे आवश्यक असेल तर ती खुल्या जागेत केली पाहिजे. योगाकरिता आयुष मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे पाहिली जावीत.

>> फिटनेस रूम आणि क्लासेसच्या सत्रांदरम्यान १५ ते ३० मिनिटांचे अंतर असले पाहिजे. येणारे जाणारे एकत्र भेटू नयेत हा त्यामागील उद्देश.

वाचा:

>> शक्य असल्यास फिटनेस क्लास ऑनलाइन घ्यावेत. खोलीच्या आकारानुसार किती लोकांना वर्गात घ्यावे याबाबत योजना आखली जावी.

>> योग संस्था / जिममधील वैयक्तिक प्रशिक्षण घेण्यासाठीही नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. पर्सनल प्रशिक्षक ६ फूटांच्या अंतराचे पालन करावे. प्रशिक्षक आणि व्यायाम करणाऱ्यांमध्ये शारीरिक संपर्क येणार नाहीत अशा प्रकारचे व्यायाम प्रकार घ्यावेत.

>> प्रत्येक सत्रात ग्राहकांची संख्या ठरवा आणि सर्व ग्राहकांमधील अंतरांची काळजी घ्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here