बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने स्टीव्ह स्मिथच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. अश्विनने ट्विटरवरील त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केले की, ‘स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधारपद हे स्वर्गात तयार झालेलं एक अतूट बंधन आहे’. अश्विन स्मिथच्या कर्णधारपदाने खूप प्रभावित झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. जिथे टीम इंडियाने कांगारूंचा ५ विकेट्सने पराभव केला. यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १० विकेटसने मोठा विजय नोंदवला. तर २२ मार्च रोजी चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या संघाने २१ धावांनी विजय मिळवला आणि मालिका आफल्या नावे केली.
विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन
कमिन्स मायदेशी परतल्यानंतर मात्र स्मिथने संघाची धुरा सांभाळल्यानंतर त्याची खेळण्याची पद्धत बदलली. स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने या भारतीय दौऱ्यात ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त १ पराभव पत्करावा लागला आहे. तर अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.