पण क्रेडिट सुईसमध्ये असे काय आहे ज्यामुळे ती बँक बुडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. क्रेडिट सुईस ही स्वित्झर्लंडमधील दुसरी तर जगभरातील ३० महत्त्वाच्या बँकेपैकी एक आहे. फायनान्शिअल स्टेबिलिटी बोर्ड दरवर्षी अशा ३० बँकांची यादी प्रसिद्ध करते जी जागतिक आर्थिक आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यांना ग्लोबल सिस्टिमली इम्पॉर्टंट बँक्स किंवा G-SIB म्हणतात. या अशा बँका आहेत ज्या बुडाल्यास जगभर सुनामी येईल. या यादीतील एकही बँकेला कुलूप लागल्यास जगाची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल आणि मोठं आर्थिक संकट येईल. म्हणूनच स्विस सरकार या बँकेला वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जगभरातील ३० प्रभावी बँक कोणत्या?
G-SIB च्या यादीत युरोपमधील १३, उत्तर अमेरिकेतील १० तर आशियातील ७ बँकांचा समावेश आहे. उत्तर अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर १० पैकी ९ बँका अमेरिकेतील आहेत असून एक बँक कॅनडाची आहे. अमेरिकेतील बँकांमध्ये जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, सिटीग्रुप, एचएसबीसी, गोल्डमन सॅक्स, बँक ऑफ न्यूयॉर्क, मॉर्गन स्टॅनले, स्टेट स्ट्रीट आणि वेल्स फार्गो यांचा समावेश आहे. त्याचवेळी आशियामधील चार बँका चीनच्या आणि ३ जपानच्या आहेत. चीनमधील बँकांमध्ये इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, कृषी बँक ऑफ चायना, चायना कन्स्ट्रक्शन बँक आणि बँक ऑफ चायना यांचा समावेश असून लक्षणीय म्हणजे या यादीत एकही भारतीय बँक नाही.
दुसरीकडे, युरोपियन बँकांबद्दल बोलायचे तर त्यात बार्कलेज, बीएनबी परिबा, ड्यूश बँक, क्रेडिट सुईस, ग्रुप बीपीसीई, ग्रुप क्रेडिट ॲग्रिकोल, आयएजी, सॅंटेंडर, सोसायटी जनरल, स्टँडर्ड चार्टड, यूबीएस आणि युनिक्रेडिट यांचा समावेश आहे.
…मग भारतीय बँकांचं काय?
देशाची केंद्रीय बँक, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ही देशाच्या बँकिंग प्रणालीवर लक्ष ठेवून असते. रिझर्व्ह बँकेच्या कठोर धोरणांमुळे अजूनही भारतीय बँकांवर जागतिक संकटाचा कोणताही परिणाम झालेला नाही. पण तरीही सर्व बँका सारख्या नाहीत. अलीकडेच आरबीआयने तीन बँका – भारतीय स्टेट बँक, ICICI बँक आणि HDFC बँक – यांना प्रणालीगत महत्त्वाचे मानले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी या बँक महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच आरबीआय या बँकांना कधीही बुडू देणार नाही. त्याचप्रमाणे चीनने १९ बँकांना SIB यादीत टाकले आहे.