चेन्नई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताचा २१ धावांनी पराभव झाला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकली. या सामन्यात एकीकडे भारतीय संघ गडबडत असताना विराट कोहलीने मात्र त्याच्या डावात अर्धशतक पूर्ण केले. विराटने या अर्धशतकी खेळीत एक मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या वनडे मालिकेत दमदार फलंदाजी केली. चेन्नईत झालेल्या वनडे मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ संकटात सापडला असताना विराटने ५२ धावा केल्या. त्याने त्याच्या या डावात ४७ धावा करत भारत आणि ऑस्ट्रेलियामधील खेळल्या गेलेल्या सामन्यात धावांच्या संख्येत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्माने फलंदाजांवर काढली भडास, सुनावले खडे बोल
पाँटिंगने भारताविरुध्दच्या वनडे मालिकेत ५९ वनडे ६ शतक आणि ९ अर्धशतकाच्या मदतीने २,१६४ धावा केल्या होत्या. तर विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४६ एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास ५३ च्या सरासरीने २,१७२ धावा केल्या आहेत. विराटने ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या वनडे मालिकेत २,१७२ धावा करत रिकी पाँटिंगला मागे टाकले आहेत. या यादीत विक्रम माजी फलंदाज सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या वनडे मालिकेत एकून ३ हजार ७७ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे.

IND vs AUS: तिसऱ्या वनडेत सूर्याच्या फलंदाजी क्रमात का बदल केला? रोहित शर्माने सांगितलं सत्य
भारत ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा २ हजार २०८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पाँटिंगला विराटने मागे टाकले.

विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन

भारत ऑस्ट्रेलिया मधील वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू१. सचिन तेंदूलकर – ३,०७७ धावा
२. रोहित शर्मा – २,२०८ धावा
३. विराट कोहली – २,१७२ धावा
४. रिकी पाँटिंग – २,१६४ धावा
५. एम.एस धोनी – १,६६० धावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here