नवी देखील : कमाई सुरु केल्यापासूनच बचत करण्याची सुरुवात केली पाहिजे असे म्हणतात. म्हणजेच, जेव्हा तुम्ही कमावता तेव्हा तुम्ही एकाच वेळी जास्तीत जास्त बचत करू शकता. कारण एकदा का कमाईचा मार्ग बंद झाला तर पैशाची बचत करणे अवघड होऊन बसते. अशा स्थितीत वाढत्या महागाईच्या काळात नोकरी सुरु करताच निवृत्तीचे नियोजन करणेही अत्यंत गरजेचे आहे. आणि जुनी पेन्शन पद्धत संपुष्टात आल्यामुळे प्रत्येक व्यक्तीने निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे. आणि हे नियोजन अशा प्रकारे असायला हवे की तुम्ही काम करत नसताना तुमचे घर चालवण्यासाठी किती पैसे लागतील हे तुम्हाला कळेल. या हिशोबात निवृत्तीच्या वेळी होणारा खर्च आणि महागाई यांचाही समावेश करावा लागेल. अशा अर्थाने तुम्ही निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे.

निवृत्तीचे नियोजन कसे करायचे?
निवृत्तीसाठी नियोजन करताना वय सर्वात महत्त्वाचा घटक असतो. तुमच्या निवृत्तीसाठी जितका जास्त वेळ असेल तितकी कमी गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतरसाठी मोठा फंड उभा करू शकतात. म्हणजेच, तुम्ही जितक्या लवकर निवृत्तीचे नियोजन सुरू कराल तितका अधिक फंड तुमच्या हाती येईल. याशिवाय निवृत्तीसाठी नियोजन करताना भविष्यातील महागाईचा देखील विचार केला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा महागाई कितीतरी पटीने जास्त असेल. आणि त्या आधारावर तुम्हाला तुमच्या खर्चाची गणना करावी लागेल.

एअर इंडिया कर्मचाऱ्यांसाठी टाटांची VRS योजना, कोणाला होईल फायदा, जाणून घ्या
निवृत्ती नियोजनाचे सूत्र लक्षात घ्या…
या आधारे सेवानिवृत्ती निधीचे नियोजन करता येते. TOI मधील एका अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी वार्षिक १० लाख रुपयांची आवश्यकता असल्यास आणि त्याच्या निवृत्तीच्या २० वर्षाचा कालावधी शिल्लक असल्यास ६% महागाई दराच्या आधारावर त्याला २.५० कोटी रुपयांचा निधी लागेल.

गुंतवणुकीसाठी या धोरणाचा अवलंब करा
कमी पैशात जास्त बचत करायची असेल तर गुंतवणुकीत वैविध्य आणणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नये आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा.

सरकारची सुपर डुपर योजना! दररोज २०० रुपयांची बचत करून चिंतामुक्त व्हा, महिना मिळेल ५० हजारांची पेन्शन
१. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस)
२. सोने
३. SIP
४. रिअल इस्टेट

या ठिकाणी गुंतवणुकीत जोखमीच्या आधारे विविधता आणता येते. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here