Gajanan Kirtikar Replace Sanjay Raut, ठाकरेंची साथ सर्वात शेवटी सोडली अन् राऊतांची जागा पटकावली, कीर्तिकरांवर शिंदेंकडून मोठी जबाबदारी – gajanan kirtikar replace sanjay raut as shivsena parliament party leader decision taken by eknath shinde
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं गेल्या महिन्यात शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शिवसेना पक्षाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयााला उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी आता २४ एप्रिलला होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल सुप्रीम कोर्टातील घटनापीठानं राखून ठेवलेला आहे. त्या पूर्वीचं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना धक्का दिला आहे. संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदावरुन हटवण्यात आलं असून त्या जागी शिंदे गटात सर्वात शेवटी दाखल झालेल्या खासदार गजानन कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सर्वात शेवटी सोडली होती.त्यापूर्वी सेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला होता.
गजानन कीर्तिकर सर्वात शेवटी आले संधी पटकावली
जुलै २०२२ मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेच्या महाराष्ट्रातील १८ खासदारांपैकी १२ खासदारांनी एकनाथ शिंदे याच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. गजानन कीर्तिकर हे काही काळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी आणि भाजपसोबतही न जाता स्वतंत्रपणे भूमिका घ्यावी, असं मत सार्वजनिकपणे मांडलं होतं. अजून काहीही बिघडलेलं नाही, उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा; फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरेंना सभागृहातच ऑफर उद्धव ठाकरे यांनी मविआमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्यानं अखेर गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. सर्वात शेवटी एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झालेल्या गजानन कीर्तिकर यांना संसदीय नेतेपदी संधी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशा देखील चर्चा सुरु होत्या. अखेर आज एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची ससंदीय गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.
संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांविरोधात जोरदार आघाडी घेतली होती. मंत्री दादा भूसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील राऊत यांनी केले होते. त्यानंतर, त्यांच्या जागी तातडीनं गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.