पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे हात पाय बांधून तिला गांजाचा धूर देऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा संतापजनक प्रकार पुण्यातील उंड्री परिसरात घडला आहे. श्रवण राजेंद्र अंकुशे (रा. उंड्री) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून श्रवण आणि पीडित तरुणीचे प्रेम संबंध होते. मात्र, आरोपी तरुणाचे आणखी काही मुलींसोबत संबंध असल्याचे पीडित तरुणीला समजले होते. त्यानंतर पीडितेने श्रवणसोबत असलेले प्रेम संबंध तोडले होते. त्यानंतर आरोपी एक दिवस तिच्या घरी आला आणि तिला गांजा पिण्यास सांगितले. मात्र, गांजा पिण्यास तिने नकार दिल्यानंतर त्याला राग आला आणि त्याने पीडित तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचे हात पाय बांधले आणि गांजाचा धूर तिच्या नाकात सोडला. त्यानंतर तिला ग्लानी आल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

लोकसभा निवडणुकीला १ वर्ष असताना भाजपनं भाकरी फिरवली, पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांबाबत मोठा निर्णय
ज्यावेळी तिची गुंगी उतरली त्यावेळी आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने कोंढवा पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत. अतिशय संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी देखील डोके वर काढत असून त्याला आळा घालणे गरजेचे असल्याचे पाहायला मिळत आहे.

छापेमारीत पोलिसांनी नवजात बाळाला चिरडले, चार दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू, सहा जणांवर गुन्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here