थिरुअनंतपुरम: तुम्ही कधी एखादी कबरीवर क्यूआर कोड पाहिलाय का? केरळच्या त्रिसूरमधील एका कबरीवर क्यूआर कोड पाहायला मिळत आहे. अपघाती मृत्यू झालेल्या तरुण डॉक्टरच्या कबरीवर क्यूआर कोड लावण्यात आलेला आहे. कबर तयार करणाऱ्यांनी डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड लावलेला असावा, असा समज कोड पाहून होऊ शकतो. मात्र वास्तव वेगळं आहे. चर्चच्या परिसरात असलेल्या कब्रस्तानात डॉ. इविन फ्रान्सिसची संगमरवरी कबर आहे. त्यावर असलेल्या क्यूआर कोड स्कॅन होतो. यानंतर फ्रान्सिनच्या आयुष्यभरातील आठवणी पाहायला आणि ऐकायला मिळतात.डॉ. इविन फ्रान्सिस खेळता खेळता कोसळला. त्याला कोझिकोडमधील मालाबार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यानं अखेरचा श्वास घेतला. इविनच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्यासाठी ओमानमध्ये राहणाऱ्या आई-वडिलांनी अनोखा निर्णय घेतला. त्यांनी इविनच्या कबरीवर क्यूआर कोड लावला. मात्र हा क्यूआर कोड अन्य क्यूआरसारखा नाही. हा क्यूआर स्कॅन केल्यावर २६ वर्षांच्या प्रतिभासंपन्न डॉक्टरच्या आयुष्याशी संबंधित ऑडियो, व्हिज्युअल आठवणी पाहायला मिळतात. संगीत आणि क्रीडा क्षेत्रात त्यानं केलेली उत्तम कामगिरी दिसते.
तू माझा सांगाती! पत्नीला कायम सोबत घेऊन जातो फूड डिलिव्हरीसाठी; कहाणी वाचून डोळे पाणावतील
इविन अतिशय उत्तम गिटार आणि कीबोर्ड वाजवायचा. इविननं क्यूआर कोडचा वापर लोकांचे प्रोफाईल तयार केले होते. अष्टपैलू भावाच्या आठवणी चिरकाळ टिकाव्यात यासाठी त्याची बहीण एवलिननं त्याच्या कबरीवर क्यूआर कोड लावण्याचा विचार कुटुंबीयांना बोलून दाखवला. कुटुंबीयांनी तिची कल्पना आवडली. त्यानंतर कुटुंबानं क्यूआर कोड https://sites.google.com/view/iwinfrancis/home शी जोडला. या संकेतस्थळावर इविनचे फोटो आणि व्हिडीओचं भंडार आहे. इविनच्या महाविद्यालयातील कार्यक्रमांशी संबंधित आठवणी आहेत. त्यानं कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेल्या सुंदर आठवणींची क्षणचित्रं आहेत.

पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी

इविनच्या आयुष्यात बरंच काही केलं. ते काही शब्दांत सांगता येण्यासारखं नाही. त्यामुळे कबरीवर एक-दोन ओळींमध्ये काही होणार नाही, असं एवलिननं आम्हाला म्हणाली होती. कबरीवर क्यूआर कोड लावण्याची संकल्पनादेखील तिचीच होती, असं इविनच्या आई वडिलांनी सांगितलं. एवलिननं अवघ्या १० दिवसांत साईट आणि क्यूआर कोड तयार केल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here