देवरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कोशोडिंगी गावात बुधवारी पहाटेच्या सुमारास काही पोलीस कर्मचारी दोघा जणांना अटक करण्यासाठी एका घरात गेले होते, या छापेमारीच्या वेळी तान्हुल्याला चिरडल्याची घटना घडल्याचा आरोप आहे.
गिरिडीहचे पोलिस अधीक्षक अमित रेणू यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत चार दिवसांच्या मुलाला पोलिसांनी बुटाखाली चिरडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मात्र बाळाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा आढळल्या नसल्याचं रेणू यांनी सांगितलं होतं. आरोपी हा मृत बाळाचा आजोबा आहे.
ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा
“आज पहाटे 3 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पोलीस आल्यावर मी पळून गेलो. माझ्या कुटुंबातील इतर सदस्यही बाहेर गेले. माझा चार दिवसांचा नातू एका खोलीत बेडवर झोपला होता. पोलीस मला शोधत बेडपाशी आले आणि त्यांनी चिमुकल्याला तुडवलं. जेव्हा माझे कुटुंबीय नंतर खोलीत गेले तेव्हा त्यांनी बाळाला मृतावस्थेत पाहिलं” असं आरोपी भूषण पांडे म्हणाल्याचं वृत्त आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत चौकशीचे आदेश दिले होते.